उफराटा प्रवास!
‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’, अशी वेदातील प्रार्थना आहे. असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे आम्हाला घेऊन चल असा त्या प्रार्थनेचा ढोबळ अर्थ. वेदातील प्रार्थना असो, उपनिषदातील तत्त्वज्ञान असो, पुराणाचे सार असो किंवा परंपरेने चालत आलेले विचारप्रवाह असो, आमच्या पूर्वसुरींचे समस्त चिंतन मनुष्याच्या उन्नतीला एक निश्चित दिशा देणारे होते.
[…]