नवा विचार नवी दिशा!
एका विज्ञानकथेत कथालेखकाने अशी कल्पना मांडली होती की, एक दिवस वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर राहणे अशक्य होईल आणि संपूर्ण मानवी वस्ती पृथ्वीच्या पोटात स्थलांतरित होईल. पृथ्वीच्या पोटात 10 ते 20 फूट खाली जाऊन वस्ती करून राहणे माणसाला भाग पडेल. वातावरणात संरक्षक आवरण म्हणून काम करणाऱ्या ओझोन वायूचा स्तर फाटल्यामुळे सूर्याची अतिनील (अल्ट्राॅ व्हायोलेट) किरणे सरळ पृथ्वीवर येतील, या किरणांचा सामना करणे तसेच वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे शक्य न झाल्यानेच मानवाला पृथ्वीच्या पोटात आसरा घ्यावा लागेल. […]