नवीन लेखन...
Avatar
About प्रकाश पोहरे
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

कोरडेपणा नव्हे तर व्यवहार्यता!

प्रकाशन दिनांक :- 19/12/2004 अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा मुलभूत आहेत, याचाच अर्थ त्यांचे महत्त्व केवळ सामान्य पातळीवर, इतर साधारण प्राणी जगतात त्या पातळीवर जगण्यापुरते मर्यादित आहे. परंतु इतर प्राण्यांशी मानवाची तुलना करता येणार नाही. सर्वच बाबतीत मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची बौद्धिक, मानसिक क्षमता जशी उच्च […]

सार्वजनिक आणि गोपनीयतेमधे फरक हवाच!

प्रकाशन दिनांक :- 12/12/2004
असे म्हणतात की, संस्कृत ही देवाची भाषा आहे. त्यामुळेच पूजापाठ, होम- हवनात वा इतर धार्मिक कार्यांत संस्कृतचा वापर करत असावेत. वेद, गीता, रामायण आदी पौराणिक ठांथ वा शास्त्रग्रंथ हे संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत.
[…]

राष्ट्रधर्म कुठला हे ठरवावेच लागेल!

प्रकाशन दिनांक :- 05/12/2004
धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणतात. खरे तर असे जे मानतात त्यांना धर्म काय हेच माहीत नाही असेच म्हणावे लागेल. भारतात आज जवळपास 3000 चे वर जाती/ पोटजाती आहेत आणि बऱ्याचशा सरकार दरबारी सूचित समाविष्ट व्हाव्यात याकरिता ‘वेटिग लिस्ट’मध्ये आहेत.
[…]

वृथा अट्ठहास!

प्रकाशन दिनांक :- 21/11/2004

असे म्हणतात की, विश्वातील जेवढ्या काही गोष्टी शक्यतेच्या कोटीतील आहेत त्या सर्व साध्य करणे मानवी मेंदूला शक्य आहे. सर्वसाधारण जीवन जगणारा माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यात मेंदूच्या केवळ 20 टक्के क्षमतेचा वत्र्र.उपयोग करतो, हे वैज्ञानिक पाहणीतून सिद्ध झाले आहे.
[…]

सज्जनता अपराध ठरु पाहतेय!

प्रकाशन दिनांक :- 14/11/2004

मानव समूहाचा उल्लेख करताना ‘मनुष्य प्राणी’ हा शब्दप्रयोग केला जात असला तरी इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य कितीतरी प्रगत, विकसित असल्याने ‘प्राणी’ या व्याख्येत त्याचा समावेश निश्चितच होऊ शकत नाही. मानवाचा हा विकास केवळ बौध्दिक प्रातांतच झाला असे नाही तर ज्याला निखळ मानवी म्हणता येईल अशा मूल्यांच्या, भावनांच्या संदर्भातही तो इतर प्राण्यांच्या तुलनेत खूप पुढारलेला आहे. भूक, भय, निद्रा आणि मैथुन या प्राण्यांच्या प्राथमिक स्तरावरील गरजा आहेत.
[…]

सुदृढ आजारपण!

प्रकाशन दिनांक :- 07/11/2004

एका शहरात अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या माणसाने आपल्या एकुलत्या एका मुलाला डॉक्टर बनविले. खाजगी मेडिकल कॉलेजचे डोनेशन, फी वगैरे सर्व 40-50 लाख खर्च झाला. बापाच्या इच्छेनुसार मुलगा डॉक्टर झाला.
[…]

करा उद्योग भरा कर!

प्रकाशन दिनांक :- 31/10/2004

‘अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. वस्तुस्थिती ही आहे की, अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत म्हणून अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे’, एका नामवंत अर्थशास्त्रज्ञाचे हे विचार पुरेसे बोलके आहेत. एखादे राष्ट्र संपन्न होते ते केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीमुळेच, हा ठाह चुकीचा आहे.
[…]

कोण जिंकले कोण हारले?

प्रकाशन दिनांक :- 24/10/2004

राज्य विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीचे फलित, त्याचे राजकीय परिणाम असे झाले असते तर तो पडला असता, तसे झाले असते तर हा आला असता, याच्यामुळे हा पडला, त्याच्यामुळे तो पडला, या जातीने त्याला मतदान केले, त्या जातीने याला मतदान केले, कुणाचे गणित कुठे चुकले, कुणाचे जुळून आले, या आणि अशाच प्रकारच्या चर्चांचे रवंथ सध्या राज्यभर सुरू आहे. निवडणुकीचा खरा अर्थ, निवडणुकीची खरी उपयुक्तता, निवडणुकीचे पावित्र्य या चर्चेच्या गदारोळात कुठेतरी हरवून गेलेले असते.
[…]

ठिणगी ते वडवानल!

प्रकाशन दिनांक :- 10/10/2004

कोणत्याही मोठ्या घटनेची सुरुवात अगदी लहान कारणापासून होत असते. कधी-कधी ते कारण इतके लहान असते की त्याकडे सगळ्यांचेच हमखास दुलर्क्ष होते. या दुलर्क्षाची खरी किंमत मोजायची वेळ येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो.
[…]

स्थिर, स्थितप्रज्ञ!

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधुनी पाहे’, असा प्रश्न उपस्थित करीत जगात कुणीच सुखी नसल्याचा उपदेश संतांनी केला होता. संतांना सुखाची नेमकी कोणती व्याख्या अपेक्षित होती, हे ठाऊक नाही; परंतु आज प्रचलित असलेल्या सुखाच्या सरधोपट व्याख्येचा विचार केला तर शेकडो वर्षांपूर्वीचा संतांचा हा प्रश्न अगदी गैरलागू ठरतो. शेकडो वर्षांत सामाजिक, आर्थिक संरचना भरपूर बदलली आहे.
[…]

1 32 33 34 35 36 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..