नवीन लेखन...
Avatar
About प्रकाश पोहरे
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

मांगल्यातील अमंगल!

प्रकाशन दिनांक :- 26/09/2004

सध्या संपूर्ण राज्यात निवडणूक आणि गणेशोत्स्वाची धूम सुरु आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण एकप्रकारच्या धुंदीने भारावून गेले आहे. एक उत्सव सामाजिक आणि भक्तिभावाने प्रेरित असलेला तर दुसरा म्हणजे पंचवार्षिक तमाशाचा फड असलेला.
[…]

अन्याय्य न्याय?

प्रकाशन दिनांक :- 19/09/2004

‘उम्रे दराज मांग कर लाए थे चार दिन,
दो आरजू में कट गए, दो इंतजार में’
एका शायराची ही कैफियत, केवळ त्या शायरापुरती मर्यादित नाही. ही कैफियत प्रातिनिधीक आहे. ऊण्या-पुऱ्या चार दिवसाचे आयुष्य वाट्याला येते आणि त्यातले अर्धेअधिक वाट पाहण्यातच संपून जाते.
[…]

फोकमतकारांची पोटदुखी वेगळीच!

प्रकाशन दिनांक :- 12/09/2004

एकदा एका शिष्याने आपल्या गुरूला विचारले, ”महाराज, मला आयुष्य यशस्वीपणे जगायचे आहे. मला माझ्या बांधवांसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काहीतरी करायचे आहे आणि त्याचवेळी मला अजातशत्रूदेखील व्हायचे आहे. मला कोणी शत्रू असणार नाही, माझे वाईट कोणी चिंतणार नाही, अशा प्रकारचे आयुष्य मला जगायचे आहे.
[…]

अनाकलनीय पण सत्य!

प्रकाशन दिनांक :- 05/09/2004

आयुष्य डोळसपणे जगताना मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे पदोपदी अनुभवास येतात. अनेक वेळा एखादी व्यक्ती अशी का वागली, या प्रश्नाचे उत्तर प्रयत्न करूनही सापडत नाही. जर आपण सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय असलो तर असे अनुभव ही नित्याचीच बाब बनते.
[…]

केवळ उपचार!

प्रकाशन दिनांक :- 29/08/2004

‘दि ठोटेस्ट शो ऑन दि अर्थ’ या वर्णनाला सार्थ ठरविणारा ऑलिम्पिक सोहळा अथेन्समध्ये पार पडला. दोनशेपेक्षा अधिक देशाचे दहा हजाराच्यावर खेळाडू या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यात भारताचे खेळाडूही होते.
[…]

न्याय मिळवावा लागतो!

प्रकाशन दिनांक :- 22/08/2004

‘आपल्या कुटुंबीयांना उघड्यावर टाकणारा आत्महत्येसारखा मार्ग निवडणे म्हणजे पळपुटेपणा होय. त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. शेतकऱ्यांनी तो मार्ग न निवडता, जिद्दीने संकटावर मात करावी.
[…]

नव्या युगाचा नवा मंत्र!

प्रकाशन दिनांक :- 08/08/2004
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच प्रवाहीपणा हे तिचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. खळाळत वाहणारी नदी स्वत:सोबत वाटेत येणाऱ्या सगळ्यांनाच वाहत नेत असते; परंतु एखादा मोठा खडक तिच्या प्रवाहाला दाद न देता अविचल उभा राहतो. अशावेळी त्या खडकावर डोके आपटीत आपला प्रवाह अवरुद्ध करणे नदीला मान्य नसते.
[…]

चौकशा नव्हे उपाययोजना करा!

ऐतिहासिक रोम शहर जळत होते, तेव्हा सम्राट नीरो शांतपणे बासरी वाजवित होता म्हणे! घटना ऐतिहासिक आणि सत्य असली तरी ती एकदाच घडून गेली असे नाही. विध्वंसाकडे अलिप्त नजरेने पाहत आपल्याच मस्तीत जगणारा नीरो त्यानंतर पुन्हा-पुन्हा जन्माला आला आणि येत आहे. […]

पाझर फुटलाच नाही!

प्रकाशन दिनांक :- 25/07/2004
‘राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा’, सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या महाराष्ट्र भूमीचे हे वर्णन शब्दश: खरे ठरु पाहत आहे. निसर्गाची अवकृपा आणि शासन-प्रशासनाची बेफिकरी अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्र देश निकट भविष्यातच केवळ दगडांची भूमी म्हणून ओळखल्या जाऊ लागला तर नवल नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्राला बसत आहे आणि त्यातही विदर्भ-मराठवाडा या भागाला तर निसर्गासोबतच शासनाच्या बेमुर्वतपणाचाही सामना करावा लागत आहे.
[…]

व्यवस्थेचे बळी!

प्रकाशन दिनांक :- 11/07/2004

अलीकडील काळात आत्महत्यांचे प्रमाण अतिशय वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी, विद्यार्थी, पोलिसासारख्या सरकारी विभागातील कर्मचारी आणि लहान-मोठे उद्योजकदेखील आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग चोखाळत आहेत. या घटना समाजाच्या सुदृढतेचे लक्षण आहेत, असे खचितच म्हणता येणार नाही.
[…]

1 33 34 35 36 37 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..