अनाकलनीय अर्थशास्त्र
परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली.
[…]