आठवणीतील शिक्षक
आपलं वय तीन वर्षे पुर्ण झालं की एक माणूस आपल्या आयुष्यात डोकावतो तो साधारणपणे पुढची सतरा वर्षे आपल्या सोबत असतोच, वेगवेगळ्या रूपांत. हा माणूस म्हणजे ‘शिक्षक’. या वेगवेगळ्या रूपांपैकी काही रूपं, रुपं म्हणण्यापेक्षा काही माणसं म्हणुया, सदैव आठवणीत रहातात. पण आपल्या आयुष्यात निव्वळ हेच शिक्षक असतात का ? मला नाही असं वाटत. या शिक्षकांव्यतिरिक्त इतर अनेक माणसं शिक्षकाच्या रुपात आपल्याला भेटत असतात, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत. […]