आठवणी दाटतात
संध्याकाळची दिवेलागणीची वेळ. मी खेळून घरी परतलेलो असायचो. माझी ताई आणि भाई (थोरली भावंड ) आपापली कामं आटोपून तयार असायचे. मोरीमध्ये (त्यावेळी आमच्या घराला स्वतंत्र न्हाणीघर नव्हतं) स्वच्छ हात पाय धुवून मी ही तयार व्हायचो. तात्यांनी देवासमोर दिवा लावलेला असायचा. उदबत्तीचा मंद सुगंध आणि मंद तेवणारी दिव्याची ज्योत आमच्या लहानशा घरांत सायंकाळच्या उदास वातावरणाला प्रसन्नतेचं कोंदण […]