नवीन लेखन...

सुसंवाद साधण्याने

संवाद साधल्याने किंवा सुसंवादाने किंवा बोलण्याने प्रश्न, गुंता सुटतो असं म्हटलं जातं. असेलही किंवा बरोबरही असेल, परंतु नुसत्या संवादाने प्रत्येक वेळी प्रश्न सुटतील का ???? किंवा सुटतात का ????
या प्रश्नाचा थोडा सविस्तर विचार करूया. […]

चमचे

कप बशा स्टॅंडच्या दोन्ही अंगाने चमच्यांच्या रांगा झुलत असतात. यात मोठ्ठ्या चेहऱ्याचे, लांबट उभ्या चेहऱ्याचे, काही वाटोळया तर काही चपट्या तोंडाचे. उंचीही प्रत्येकाची वेगळी. कुणी लंबाडे तर कुणी मध्यम उंचीचे, काही अगदीच बुटुकलेही असतात, पण त्यांची राहण्याची जागा वेगळी असते. […]

मदतीचा हातभार

तसा मी घरात बायकोला थोडीफार मदत ही करतच असतो. अहो, खरंच ! म्हणजे “वॉशिंग मशिन लावणे” तर तुम्ही वाचलच असेल. म्हणजे नसेल तर वाचा इतकंच यातून सांगायचंय. याशिवाय भाज्या , कांदे, बटाटे, टोमॅटो चिरून…आता चिरून म्हणजे अगदी विळीवर बसून वगैरे नाही हो, सुरीनेच देतो चिरून. भेंडी नावाची भाजी चिरायला तुम्हाला सांगतो, मला अज्जीबात आवडतं नाही. बुळबुळीत […]

बाजारहाट, मन भरून येणारी सैर

मन भरून येणारी सैर ही क्रिया मला फार आवडतेच, आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते. पूर्वी मला दादरच्या भाजीबाजारात किंवा फुलबाजारात फिरायला फार आवडायचं. हल्ली तिथे एक एक पाऊल उचलणं कठीण झालंय. असो, तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच सूचना सुध्दा अलवारपणे येत असतात, “फ्लॉवर कोबी नीट बघून […]

कपडे वाळत घालणे एक प्रवास

पुढच्या काळात धोका नामशेष झाला, 501 बार जाऊन त्या जागी डिटर्जंट पावडर आली. कपड्यांचं टिकाऊपण कमी झालं. त्यांना धोक्याचा मार झेपणं शक्यच नव्हतं. मग खराखरा चालणारे प्लास्टिक ब्रश आले. घराघरातल्या दहीहंडी दांड्या जाऊन बाल्कनी बाहेरच्या ग्रिलमध्ये स्टील दांड्यावर कपडे वाळत पडू लागले. […]

मनोहर राजाराम कुळकर्णी

मनोहर राजाराम कुळकर्णी म्हणजे माझा कुणी भाऊ नाही किंवा कुणी मित्रही नाही , तर ते होते माझे सख्खे काका. आता ते चांगले, म्हणजे डोक्यावर परिणाम होण्यापूर्वीचे मला बरेचसे अंधुक आठवतात. […]

बांधणी भाषेची आणि दडलेले अंतरंग

मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ?
घाबरून जाऊ नका ! मी काही मराठी भाषा आणि तिच्यावर साधक बाधक चर्चा यामध्ये अजिबात शिरणार नाहीय. […]

काळं अधिवेशन

क्षुल्लक विषयावरचं सेशन -बराच वेळ रंगवलं होतं दोघांनी.मी ही मग घरात आलो -घोषणा मात्र ऐकू येत होत्या -एकाच साच्यातल्या,बहुधा काकंत्रालयाच्या बाहेर -पायऱ्यांवर बसून दिल्या जात असाव्या.आवेश तोरा अन् दिखाऊपण मात्र -अगदी तस्संच होतं. […]

अर्थ प्रेमाचा

“तू तुझी तब्येत आधी सांभाळ” ! “तू माझ्या आधी जायचं नाही” ! (निजधामाला) “तू माझ्या आयुष्यातून गेलीस तर माझं कसं होईल अगं ?” या सूचना आणि प्रश्न माझा एक साठी पार केलेला मित्र, आपल्या पत्नीला देत आणि विचारत असतो. पहिले छूट यामागे आपल्या जोडीदाराबद्दलची काळजीच जाणवते, परंतु याकडे थोडं बारकाईने पाहिल्यावर, यामागची जाणवणारी एकटेपणाची भीती दिसायला […]

जेवण संस्कृती

आपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या. […]

1 2 3 4 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..