जाणीव नव्याने
माझी अर्धांगिनी गुडघ्याच्या दुखण्याने आजारी झाली, डॉक्टरनी तिला औषधांसहीत पूर्ण आराम सांगितला आणि स्वयंपाकाव्यतिरिक्त घरातलं सगळं (कुणी म्हणेल “मग काय सगळं?”) काम करता करता मला अनेक गोष्टींची नव्याने जाणीव होऊ लागली. […]
माझी अर्धांगिनी गुडघ्याच्या दुखण्याने आजारी झाली, डॉक्टरनी तिला औषधांसहीत पूर्ण आराम सांगितला आणि स्वयंपाकाव्यतिरिक्त घरातलं सगळं (कुणी म्हणेल “मग काय सगळं?”) काम करता करता मला अनेक गोष्टींची नव्याने जाणीव होऊ लागली. […]
तीन वर्षांपूर्वी माझ्या षष्ठ्याब्दीपूर्तीच्या निमित्ताने बाप्पावर केलेली कविता. काल रात्री स्वप्नात, एन्ट्री घेतली बाप्पाने. ठोके दिले बाराचे, त्याचक्षणी घड्याळाने. सोंड हलवत, मस्त झुलत – माझ्याजवळ आला, काय पहातोय मी? विश्वासच बसेना झाला. एकसष्ट मोदकांचं तबक – होतं हाती त्याच्या, बाप्पाच्या हातचे मोदक – वाट्याला येणार कुणाच्या? झटक्यात संपूर्ण ताटच त्याने – माझ्यासमोर धरलं, हातात घेऊन हात […]
तर सांगत काय होतो, मध्यंतरी आमच्याकडे नेहमी झाडू पोछा करायला येणारी मुलगी, तिची तब्येत बिघडल्यामुळे यायची बंद झाली, आणि पोछाचं काम माझ्यामागे लागलं. डॉक्टरनी तिला पूर्ण विश्रांती, म्हणजे आपल्या भाषेत bed rest सांगितली होती. डॉक्टरनी सांगून त्यांचं काम केलं, पण तिला घरी बसून पोटाला कोण घालणार ? घरभाडं, मुलांची शाळा, पोटपूजा यासाठी हालचाल करणं भाग होतं. […]
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली, “आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत……….” संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं. उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता. प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला. […]
“ज्या वेळी धर्म लयाला जाऊ लागेल, अधर्म प्रबळ होऊ लागेल त्या वेळी, सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माची मुहूर्तमेढ पुन्हा रोवण्यासाठी, प्रत्येक युगात मी जन्म घेईन”. या स्वतःच्या वचनाला जागत, त्याने द्वापारयुगात जन्म घेतला. […]
आमच्या लहानपणी , “मुकाट्याने जेव बरं, आणि नंतर काय ती बडबड कर…. “ हे वाक्य जेवताना कमीतकमी एकदा तरी आईच्या तोंडातून यायचंच. म्हणजे जेवायला आम्ही सगळे एकत्र पाटावर बसायचो, पण आजच्यासारखं गप्पा मारत, हास्य विनोद करत जेवण होत नसे. बोलत बसलं की, तेव्हढ अन्न कमी जातं पोटात, ही आयांची धारणा होती. त्यामुळे मोजकच , जरुरीपुरतं बोलायचं […]
नुकतेच आम्ही दोन दिवसांसाठी एका रिसोर्टला भेट देऊन आलो आणि आल्या आल्याच त्याने मान टाकली. कळतंय का तुम्हाला??? दोऽऽऽन दिवस त्याच्याशिवाय… माझ्या बायकोने काढले. कसे काढले तिलाच माहित. खूऽऽऽप खूऽऽऽप त्रास होत होता तिला, लक्ष कशा कशात लागत नव्हतं, जीवन असार आहे असं वाटू लागलं होतं. तसा मी(आयुष्याचा साथीदार)आणि आमचा लेक घरातच होतो जवळच तिच्या, म्हणजे […]
एकेका पदार्थाचा काय महिमा असतो नाही? पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, बासुंदी, मणगणं…जाऊदे, थांबतो इथेच. विचारानेही त्रास होतो हो उगाच. आता इथे मी मला आवडणारे पदार्थ घेतलेयत. दुसरं कुणी त्याच्या आवडीच्या पदार्थांची यादी सांगेल. व्यक्ती तितक्या प्रकृ… आवडी. प्रत्येक प्रांतातील नागरिकांना तिथल्या परंपरागत पदार्थांचा मनापासून अभिमान असतो, आणि आपल्याकडे आलेल्या परप्रांतातील पाहुण्यांना हे पदार्थ ते आग्रहाने खाऊ घालतात. […]
गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. […]
काळेभोर डोळे, काळा लांबसडक केशसंभार ही एकेकाळी सौंदर्याची प्रतीकं मानली जात होती. आज लांबसडक केशसंभार सांभाळायला, त्याची निगा राखायला वेळच उरलेला नाही. असो, आपली काळया रंगाशी सोबत अगदी जन्मल्यापासून असते. पूर्वी आणि काही प्रमाणात आजही नवजात बाळाला न्हाऊ माखु घातल्यावर कानाखाली काळं तीट आणि घरात पाडलेलं काजळ, डोळे भरून लावलं जायचं. काळं तीट दृष्ट लागू नये […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions