धर्माधिकारी गुरुजी
आमच्याकडे धार्मिक विधी, नैमित्तिक पूजा अर्चा, एकादष्णी ,संकष्टी, श्रावणमासातील पूजा हे नित्याचच होतं. त्या लहानशा घरातला एक कोपरा देवघराने भरलेला होता. तात्यांची रोज भल्या पहाटे उठून पूजा चालायची. त्यांचं आध्यात्मिक पुस्तकांचं वाचनही प्रचंड होतं. घरात इतरही साहित्य संग्रह प्रचंड होता. थोडक्यात सांगायचं तर वाचन श्रीमंती भरपूर होती. […]