नवीन लेखन...

मर्यादा पुरुषोत्तम

राम हा पूर्णपुरुष आहे. तो एका वचनाधीन राज्यकर्त्यांचा अज्ञाधारक पुत्र आहे. ज्या कैकयीमुळे त्याला थोडंथोडकं नव्हे तर चौदा वर्ष वनात जावं लागलं अशा आईविषयी कणभरही मनात किंतू, राग न धरणारा मुलगा आहे. तो एकपत्नीव्रत घेतलेला निष्ठावंत पती आहे. […]

काय म्हणावं याला? योगायोग, चमत्कार की काही?

आंध्रच्या सीमेवरचं गाव, तिरूवन्नमलै. जिथे तिथल्या वातावरणाने मन प्रसन्न करणारा एक आश्रम आहे. आश्रम म्हणजे, त्या परिसरात एक शंकर मंदिर, वेदविद्याध्ययन करणारी पाठशाळा, आश्रमात येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची उत्तम सोय, ध्यानधारणा करण्यासाठी शांत प्रसन्न वाटणारी एक प्रशस्त खोली. या ठिकाणी रमण महर्षी नावाचे एक थोर संत होऊन गेले. त्यांच्याच नावाने हा आश्रम आहे, रमाणाश्रम. आश्रमात सकाळ संध्याकाळ धार्मिक विधी, वेदपठण सुरू असे. आश्रमाच्या मागच्या बाजुला, पसरलेला अरुणाचल पर्वत आहे. […]

सांगावसं वाटलं म्हणून , त्या भाजीविक्रेत्या

मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात. […]

बालमोहन विद्यामंदिर

दादासाहेब रेगे हे व्यक्तिमत्त्व काय होतं, आणि त्यांच्या बालमोहनने आपल्या बाळांना काय दिलं, हे प्रत्येकजण सांगू लागला असता, तर एक सप्ताहच आयोजित करावा लागला असता. आपण एका मराठी शाळेत शिकलो, याचा सार्थ अभिमान, उपस्थित प्रत्येक कीर्तिवंताच्या बोलण्यातून डोकावत होता. […]

श्री लक्ष्मीनृसिंह संस्थान, वेलींग

लक्ष्मीनृसिंहाच्या गाभाऱ्यात स्नान करून ओल्या वस्त्रानेच जाता येतं. तात्या(वडील) सकाळी लवकर उठून आंघोळ करून तळ्यातल्या पाण्याची कळशी भरून घेऊन गाभाऱ्यात यायचे. गुरुजींचा अभिषेक सुरू असायचा. देवाच्या मूर्तीवर कळशीतल्या पाण्याचा अभिषेक करायचा. पुढे देवाची साग्रसंगीत पूजा व्हायची. मूर्तीवर चांदीचा मुखवटा चढवून फुलांनी सुंदर सजवलं जायचं. गाभाऱ्याबाहेरच्या जागेत बसून पूजेचा सोहळा पाहाण्याचा आनंद अवर्णनीय असायचा. […]

मुलगी शिकली

स्वयंपाकघरापासून शेजघरापर्यंत, तिचं आयुष्य जडलं होतं. जन्म देणं अन् रांधून वाढणं, इतकंच तिचं कर्म होतं. किंमत तिच्या शब्दाला नव्हती, शिकण्याची गरज वाटत नव्हती. अबला अबला म्हणून आधाराने, जगत ती रहात होती. तिला शिकून करायचंय काय?, घरातच राहणार तिचा पाय. तोंड तिने उघडायचं नाय, दोन वेळचं जेवण,वर्षाकाठी लुगडं – जगायला आणखी लागतंय काय? गृहलक्ष्मीच्या हातातच लक्ष्मी नव्हती, […]

कन्नुदादा (एक काल्पनिक व्यक्तिचित्र)

कन्नुदादाशी आणि माझी ओळख कशी झाली, आणि तो आमच्याकडे कधीपासून येऊ लागला हे आता आठवतही नाही.  घरात काही मोठं काम करायला काढलं, म्हणजे संपूर्ण घराची स्वच्छता, माळ्यावरचं सगळं जड सामान काढून माळा स्वच्छ करून पुन्हा जागच्या जागी ठेवणे, घरात काही समारंभ असला किंवा लग्नकार्य असलं की सामानाची ने आण करणं अशा कामांसाठी मी त्याला मदतीला बोलावून घेत असे. […]

चैत्र शुद्ध प्रतिपदा

चैत्र वर्ष दाराशी आले, डोकावुनी ते मला म्हणाले, वर्तमान मी आहे तुमचा, झाले गेले गंगेस मिळाले. नवे वर्ष अन् नव्या कल्पना, घेऊन क्षितिजावर अवतरू पुन्हा. विसरुनी सरत्या ‘काळां ‘ आपण, होऊ सज्ज, समजावू मना. नवे वर्ष, उमेद नवी ती, ठाम निश्चया घेऊनी सोबती, लाभेल उभारी पुन्हा एकदा, स्वप्ने फुलतील पुन्हा सभोवती. लिहित रहा, वाचीत रहा तू […]

प्रवास एका लेखक, निवेदकाचा

नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शारदा कृषी वाहिनी 90.8 FM वरून माझी (प्रसाद कुळकर्णी) मुलाखत प्रसारित झाली. विषय होता, ‘ प्रवास एका लेखक निवेदकाचा ‘ मुलाखतकार होत्या, प्रा.ज्योती जोशी, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर बारामती. निवेदक, सुसंवादक आणि लेखक म्हणून झालेला माझा प्रवास आणि या प्रवासात आलेले अनुभव, स्वतःच्या घरातूनच मिळालेले वाचनसंस्कार या सगळ्या गोष्टींचा […]

केस भादरणे ते हेअर कटींग

घरातल्या मुलांसाठी तर त्यांना दर एक दीड महिन्यानंतर येण्याची standing instructionच दिलेली असायची. या बहुतेक नाभिकांचा पेहरावही सारखाच असायचा. काळी टोपी, अंगात बुशशर्ट आणि धोतर किंवा लेहंगा. हातात पत्र्याची वरून उघडणारी पेटी. […]

1 5 6 7 8 9 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..