नवीन लेखन...
प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

माझी ‘दर्या’दिली : सुएझ कालवा व्हाया सोमालिया

सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होतं. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि […]

प्री सी ट्रेनिंग

बाबा पोलीस खात्यामध्ये थेट फौजदार म्हणून भर्ती झाले होते त्यामुळे त्यांची खाकी वर्दी आणि खांद्यावर असणारे दोन चांदीचे स्टार बघत बघत मोठे होत होतो. सहावित असतानाच बाबांचं प्रमोशन झाल्याने आणखीन एक तिसरा स्टार वाढला. पी एस आय चे इन्स्पेक्टर झाले आणि रिटायर होता होता ए सी पी झाले. त्यांच्या खाकी वर्दीला असणारा रुबाब आणि त्याहीपेक्षा असणारा […]

मॅन ओव्हरबोर्ड

बंगालच्या उपसागरात एक मासेमारी करणारी भारतीय बोट पाण्यात बुडाली. त्या बोटीवर 15 सहकाऱ्यांसह असणारा एक भारतीय खलाशी रबिंद्र दास सुमारे पाच दिवस कशाच्या तरी आधारावर तरंगत राहिला पण 600 km खोल समुद्रात प्रवाहा सह वाहून गेला. समुद्रात पाच दिवस अन्न आणि पाण्याशिवाय तेही वादळी हवामानात तो जिवंत राहिला होता. हवामान खराब त्यात जी बोट बुडाली होती […]

सॅल्युट

आजही मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) म्हणजेच आमच्या मेरी मुंबई येथील प्री सी ट्रेनिंगचा पहिला दिवस आठवतोय. पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चर मध्ये भारतीय नौदलातील रिटायर्ड झालेले एक अधिकारी इंस्ट्रक्टर म्हणून आमच्या वर्गावर आले होते. त्यांनी मग सगळ्यांना विचारले की तुम्हाला माहिती आहे का आर्मी, एअरफोर्स आणि नौसेना या तिन्ही दलांमध्ये सॅल्युट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. […]

गॅली

जहाजावर किचनला गॅली बोलले जातं. जेवण बनवण्यासाठी या गॅली मध्ये एक कुक आणि त्याला मदत करायला तसेच अधिकाऱ्यांना जेवण सर्व्ह करण्यासाठी एक स्टिवर्ड असतो. जहाजावर हल्ली एकच कुक असतो तरीपण त्याला सगळे चीफ कुक असेच बोलतात. एकटा चीफ कुक सकाळी पाच साडेपाच पासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यन्त सर्व खलाशी आणि अधिकाऱ्यांचे […]

कोर्सेस

एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्यावर जोपर्यंत जहाजावर नोकरी करायची आहे तोपर्यंत जहाजावर आणि घरी असताना सुध्दा कोर्सेस करावे लागतील याची फारशी कल्पना नव्हती. प्री सी ट्रेनिंग पूर्ण करता करताच पाच बेसिक कोर्स आणि त्यांचे पाच सर्टिफिकेट मिळाले. मग आणखीन दोन कोर्सेस जे सुमारे सात ते आठ दिवसांचे होते. त्यानंतर ब्राझिल व्हिसा साठी पोलीस […]

माझी ‘दर्या’दिली : नवीन जहाजाची जॉइनिंग व्हाया सिंगापूर

सिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय त्यामुळे आज हॉटेल मध्ये थांबावे लागेल. एजेंट ने त्याच्या गाडीतून आम्हाला हॉटेल मध्ये ड्रॉप करून रूम […]

तारफुल

तारफुल म्हणजे नावावरून कोणाला वाटेल की कुठल्या तरी रानटी किंवा जंगली फुलांचा प्रकार आहे. पण तारफुल म्हणजे ताडाच्या झाडाला येणारे फळ आमच्या आगरी भाषेत ताडफळाला तारफुल बोलतात. उन्हाळ्यात थंडगार व गोड गोड ताडफळा साठी हल्ली खूप मागणी होत आहे. […]

सेफ्टी मीटिंग

रात्री उशिरा पर्यंत ड्युटी केली असल्याने दुपारी एक नंतर पुन्हा ड्युटीवर जायचे होते. जहाज अमेरिकेच्या फिलाडेल्फियाच्या दिशेने फुल्ल स्पीड मध्ये पाणी कापत चालले होतं. समुद्र शांत होता प्रवाहाच्या दिशेने जात असल्याने जहाजाला चांगलाच वेग मिळाला होता. सकाळी नाश्ता केल्यावर मोकळी हवा खाण्यासाठी ब्रिज डेकवर उभा राहून संथ पाण्यामध्ये जहाजाच्या मागे प्रोपेलरमुळे निळं पाणी घुसळून निघाल्यावर तयार […]

ब्लॅक मॅजिक ऑनबोर्ड

डोळ्यातून रक्त येतेय की काय असे चीफ ऑफिसरचे लालबुंद डोळे पाहून सगळ्यांना वाटत होते. पण तो कोणाकडेही रागाने किंवा विक्षिप्त नजरेने बघत नव्हता. त्याला स्वतःलाच खूप त्रास होत होता तो दुसऱ्यांना काय त्रास देणार. अंगाला दरदरून घाम फुटला होता. मागील चार दिवसांपासून तो कॅप्टनला येऊन घरी घडणारे प्रकार सांगत होता. पहिल्या दिवशी त्याच्या बायकोला घराच्या गेट […]

1 14 15 16 17 18 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..