दी मोस्ट स्पोकन लँग्वेज
शाळेत असताना आणि नंतर कॉलेज मध्ये गेल्यावर पण जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे इंग्रजी आहे असा समज होता. पण नंतर नंतर जहाजावर असताना ब्राझील, रशिया, युक्रेन, इस्रायल आणि युरोपियन देशांमध्ये जहाजं किनाऱ्याला लागल्यावर बाहेर फिरायला गेलो की इंग्रजीला किती किंमत आहे ते कळून चुकायचे. नंतर नंतर स्पॅनिश ही भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते असे कानावर यायचं आणि इंग्लिश चा नंबर तिसरा का चौथा लागतो असे सांगितले जायचे. पण हल्ली गूगल सर्च केले की जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा ही चायनीज आहे त्यापाठोपाठ स्पॅनिश मग इंग्रजी मग हिंदी, अरबी आणि बंगाली असा काहीसा क्रम दाखवला जातो. […]