नवीन लेखन...
प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

एक डोळ्याची दिव्यदृष्टी

गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती. लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवाशी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते. […]

आयुबोवान

कोलंबो एअरपोर्ट वरुन टेक ऑफ घेतल्यावर विमान जकार्ता च्या दिशेने ३६० अंशात फिरले. कोलंबो च्या किनाऱ्याला मुंबई च्या किनाऱ्या प्रमाणे समुद्र भिडत होता. पण मुंबई सारखं काँक्रिटचे जंगलाने कोलंबो च्या किनाऱ्याला वेढलेले नव्हते.
नारळाची हिरवीगार झाडे आणि त्या झाडांच्या आतून डोकावणारी लहान मोठी घरे कोलंबो शहर मागे पडताना दिसत होती. […]

बीज अंकुरे अंकुरे

सकाळी सव्वा सातच्या सुमारास फलटणच्या दिशेने जाताना कात्रज गेल्यावर बोपदेव घाटातील नागमोडी वळणे घेत पुणे शहरातील काँक्रीटचे जंगल बघायला मिळाले. पश्चिमेकडील सहयाद्रीच्या पर्वतरांगा काहीशा पोपटी आणि काहीशा हिरव्या रंगाचा शालू नेसून नटल्या सारख्या दिसू लागल्या होत्या. वातावरण काहीसं ढगाळ असले तरी काही कोवळी सूर्यकिरणे ढगांची चादर पार करुन, रस्त्याच्या कडेला, खडकाळ पठारावर नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या लुसलुशीत […]

वरची ब

गावातले आमचे जुने कौलारू घर दोन माळ्याचे आहे. आमच्या त्या घरात माझ्या दोन काकांचे आणि आमचे असे तीन कुटुंब एकत्र राहायचे. शेतावरच्या घरात मोठा काका तर गावात अजुन एका घरात आणखीन एका काकाचे कुटुंब. आम्ही ज्या घरात राहायचो त्या घराच्या तळमजल्यावर आम्ही आणि दोन नंबर काकाचे कुटुंब तर वरच्या माळ्यावर तीन नंबर काकाचे कुटुंब. वरच्या माळ्यावर […]

व्हिडिओ कोच

मुंबई सी एस एम टी ला लोकल प्लॅटफॉर्म वर आली होती पण अनाउन्समेंट किंवा इंडिकेटर वर कोणती लोकल आहे त्याची कुठलीच सुचना नव्हती. त्यामुळे फारशी लोकं लोकल थांबायच्या आत आणि थांबल्यावर सुद्धा चढली नाही. मला कल्याणला जायचे असल्याने मी पटकन चढलो आणि विंडो सीट मिळवली. दोन मिनिटात इंडिकेटर वर ती लोकल 6.53 ची कर्जत फास्ट असल्याचे […]

माणसं जोडणारा गणेशोत्सव

बर्वे साहेबांना गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले तरीही कामाच्या व्यापामुळे घरातल्या गणेशोत्सवासाठी गणपतीची मुर्ती अगोदरच जाऊन बुक करता आली नव्हती. या शहरात बदली होऊन राहायला येऊन त्यांना चारच महिने झाले होते. तसे कामावर जाता येताना त्यांच्या नजरेस दोन तीन मुर्तीकारांच्या कार्यशाळा पडल्या होत्या. बर्वे बाईंनी आणि मुलांनी श्री गणेशाची मुर्ती पसंत केली का असे विचारले असता […]

“अपरिचित जगाचे यथार्थ चित्रण”

समुद्राचं आकर्षण कोणाला नसतं? समुद्र आणि त्याचं अथांगपण हे मानवी आयुष्याला वेढून टाकणार आहे. आपण सामान्य माणसं आपलं सरळसोट आयुष्य जगत असतो, त्यावेळी समुद्रावर, तेथील जहाजांवर असणारे दर्यावर्दी, त्यांचं पाण्यावर तरंगणारं जीवन कसं असेल याचंही एक सुप्त आकर्षण आपल्या मनात असतं. समुद्रावरील जहाजे महिनोंमहिने त्या अथांग प्रवाहावरून दूरदेशी जात असतात. त्या आयुष्यात आव्हाने आहेत, साहस आहे, […]

पॉझिटीव्ह एनर्जी

देशमुख साहेबांना रात्री दीड वाजता छातीत दुखू लागले. त्यांनी विराजच्या आईला उठवले आणि छातीत दुखतंय असं सांगितलं. गेल्याच आठवड्यात पारकर साहेबांच्या पण रात्री छातीत दुखू लागले होते, पण त्यांना ॲसीडीटी झाली असेल असं समजुन मुलाने अँटॅसिड पाजले आणि झोपायला सांगितले. रात्री झोपलेले पारकर साहेब सकाळी उठलेच नाहीत. त्यांचा मुलगा नंतर ऊर बडवून मीच बाबांना मारलं, त्यांना […]

कॅज्यूअल्टी

बंगल्याबाहेर गाडीची चाहूल लागताच चार वर्षांचा समीरने धावत धावत जाऊन त्याच्या पप्पांना गाडीतून बाहेर पडल्या पडल्या पायाला घट्ट मिठी मारली. डॉ. विजय यांनी लाडाने त्यांच्या समीरला उचलून घेतले आणि बंगल्याच्या पायऱ्या चढु लागले. मुलाला बघून त्यांचा दिवसभरातील थकवा आणि ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला. समीर सोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर डॉ. आनंद यांनी गरम पाण्याचा शॉवर घेतला […]

पांढरा शर्ट खाकी पँट

शैक्षणिक मुल्ये, संस्कार, निती , शैक्षणिक क्रांती हे सगळं पांढऱ्या शर्ट आणि खाकी पँट सारखं काळाच्या पडद्या आड जाऊ लागले आहे आणि ह्याला जबाबदार अशा शाळांचे चोचले पुरविणारी पांढरा शर्ट आणि खाकी पँट घालून शिकलेली तुमची आणि आमची पिढीच आहे. […]

1 2 3 4 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..