साईन ऑफ इन लॉक डाऊन
जकार्ता हुन निघाल्यावर साडे सहा ते सात तासात मुंबईत लँड झाले आणि अर्ध्या तासात इमिग्रेशन आणि सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्हाला राज्य सरकारच्या ताब्यात दिले गेले. परंतु कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून ते क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या वाशीच्या हॉटेल मध्ये जायला साडे बारा वाजले. […]