नवीन लेखन...
प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

दिनमित्र

दिनमित्र म्हणजे तेजस्वी असा सूर्य आणि दीनमित्र म्हणजे दीन दुबळ्या गरिबांचा मसीहा . माझे आईचे वडील म्हणजे आमच्या ति. नानांनी माझ्या दोन नंबर मामाचे नाव दिनमित्र ठेवले होते, […]

जॉइनिंग ऑनबोर्ड

जकार्ता सोडल्यावर बोट निघाल्यापासून तासाभरात निळ्याशार समुद्रात गेल्यावर वारा आणि लाटांमुळे बोट रोलिंग करायला म्हणजेच घड्याळाच्या दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलायला लागली होती. सकाळचे सव्वा आठ की साडेआठ वाजता बोटीत येऊन सीटवर बसल्या बसल्या थंडगार एसी मुळे जी झोप लागली ती दोन तासांनी अनाउन्समेंट झाली नसती तर कदाचित उडाली नसती. […]

जकार्ता मेडिकल चेक अप

सकाळी सव्वा सात वाजता एजंट सैफुल हॉटेलच्या लॉबी मध्ये येऊन थांबला होता. अर्ध्या तासात हॉस्पिटल असलेल्या भागात पोचलो, पण माझे मेडिकल चेक अप नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये नसल्याने सैफुल ला थोडं शोधावं लागलं. जकार्ता मधील लिप्पो व्हिलेज या पॉश एरिया मध्ये सिलोम हॉस्पिटल ची मोठी शाखा होती. […]

तेरीमा कसीह

डिपार्चर नंतर अरायव्हलला पब्लिक ऍड्रेस सिस्टिम वर इंडोनेशियन भाषेत अनाउन्समेंट झाल्यावर तेरीमा कसिह हा शब्द ऐकला. तोच शब्द विमानातून बाहेर पडताना एअरहोस्टेस सगळ्यांना बोलत होती. तेरीमा कसिह या इंडोनेशियन शब्दाचा अर्थ म्हणजे धन्यवाद. […]

ब्लँक कॉल

चीफ ऑफिसरने सुरवात केली, तुम्हा सर्वांपैकी कोणाला एखाद्या बद्दल काही तक्रार असेल तर चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन कडे येऊन तसे सांगावं. पण अशाप्रकारे कोणाला त्रास देऊ नये. मागील दोन दिवसापासून कॅप्टन च्या केबिन मध्ये रोज रात्री कोणत्याही वेळेला फोन करत आहे. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तीन चार वेळेला कोणत्याही वेळी ब्लँक कॉल करून कॅप्टनची झोपमोड केली जातेय. […]

बॅक टू सी

सुमारे अडीच वर्षानंतर ऑफिसमध्ये जॉइनिंग करण्याकरिता जुलै 2017 मध्ये रिपोर्ट केल्यानंतर प्रत्यक्ष जहाजावर पुन्हा जॉईन करण्यासाठी मध्ये जवळपास दीड महिना गेला. बॉस ने अडीच वर्षानंतर जॉईन करायला जाऊनसुद्धा प्रमोशन देऊन अनपेक्षित धक्का दिला होता प्रमोशन मिळून तीन पट्ट्या मिळण्यापेक्षाही पाच ते सहा महिन्यांऐवजी तीन महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळणार याचाच जास्त आनंद झाला. […]

नायजेरियन माफिया

संध्याकाळी डिनर झाल्यावर स्मोक रूम मध्ये गप्पा मारत असताना कॅप्टन ने सेकंड इंजिनियरला विचारले तुम्ही मिसेसला सोबत आणणार होते असा मेसेज आला होता नंतर पुन्हा एकटेच येतायत असा मेसेज आला, असा कोणता प्रॉब्लेम आला ऐनवेळी की मिसेस जॉईन नाही करू शकल्या. […]

मुंबई – जकार्ता व्हाया दुबई

मुंबईवरून आलेले आमचे फ्लाईट लँड झाल्याझाल्या एअरपोर्ट च्या ग्राउंड स्टाफ ची गडबड आणि विमानांची गर्दी लक्ष वेधून घेत होतं. माझा पहिलाच विमानप्रवास आणि पहिलीच परदेशवारी त्यामुळे सगळ्याच गोष्टींच अप्रूप वाटत होतं. […]

मोहोरलेले अलिबाग

हिरव्या गर्द आंब्याच्या झाडावर येणारा मोहोर जसं जसे दिवस वाढत जातात तसं तसा रंग बदलत जातो. सुरवातीला दिसणारे पोपटी किंवा तांबूस कोंब बहरल्यावर हिरवे दिसतात नंतर चॉकलेेटी किंवा ब्राऊन होत जातात आणि मोहोर फुलल्यावर थोडेसे पांढरे दिसल्या सारखे भासतात. […]

टॅटू

अरे हे काय गोंदवून घेतलंस दंडावर?? एका मित्राला त्याच्या दंडावर केलेली रंगीबेरंगी कलाकारी अभिमानाने दाखवत असताना बघितल्यावर विचारले. रंगीबेरंगी नव्हतं फक्त लाल आणि काळपट हिरव्या रंगात कसली तरी सिँहाच्या तोंडासारखी आकृती होती. […]

1 5 6 7 8 9 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..