एन आर आय स्टेटस
पहिल्यांदा जहाजावर गेल्यावर एन आर आय स्टेटस म्हणजे नेमकं काय असतं याचा उलगडा झाला कारण जहाजावर जाण्यापूर्वी एन आर आय, एन आर आय हे फक्त ऐकून होतो. […]
पहिल्यांदा जहाजावर गेल्यावर एन आर आय स्टेटस म्हणजे नेमकं काय असतं याचा उलगडा झाला कारण जहाजावर जाण्यापूर्वी एन आर आय, एन आर आय हे फक्त ऐकून होतो. […]
गोडांब्या कडे बघूनच कोणालाही डेरेदार वृक्ष प्रत्यक्षात कसे असतात हे लगेच लक्षात येईल. भरगच्च पानांनी नेहमी बहरलेल्या गोडांब्याच्या खाली मे महिन्याच्या गर्मीत सुद्धा थंडगार वाटते. त्याच्या शितल छायेत एकदा बसल्यावर पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत उठायची इच्छाच होत नाही. […]
2008 साली जे करिअर निवडलं होतं ते सोडून बांधकाम व्यवसाय करताना कुठंतरी मनात खटकायचे की हा व्यवसाय तर कोणीही करू शकतो पण जहाजावर काम करण्यातील वेगळेपणा आणि चॅलेंज याची भुरळ पडली म्हणून हे करियर स्वीकारले आणि त्याच वेगळेपणाला आणि चॅलेंज ला कंटाळून आपण जहाजावरील जॉब सोडून दुसरंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. […]
सकाळी सात च्या सुमारासच त्या परिसरात गेल्याने धुक्याची अंधुकशी चादर पसरली होती. मध्येच एखाद्या वाडीतील दोन चार घरातून बाहेर पडणारा धूर धुक्यात मिसळताना दिसत होता. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या लहान लहान सरींनी पळसाच्या पानांवर पावसाचे टपोरे थेंब खाली पडायच्या अवस्थेत खोळंबल्यासारखे दिसत होते. […]
तीन बैलजोड्या होत्या त्यातील एक एक जोडी कमी होत गेली. शेवटी शेवटी तर एकच बैल उरला होता. एक बैल काहीच कामाचा नसल्याने त्याला विकण्या शिवाय पर्याय नव्हता असे असूनही त्याला विकायची ईच्छा होत नव्हती. एकाच बैलाला काही वर्षे संभाळल्यावर बाबांच्या एका मित्राने त्याला विकत नेण्याची तयारी दर्शवली. […]
रस्त्यावरून जाणाऱ्या गाडयांना हातातील गजरे हलवून दाखवणाऱ्या त्या लहान मुलीला, बाय गजरे कसे दिले विचारले आणि तिने दहाला एक सांगताच वीस रुपयात दोन गजरे विकत घेतले. न उमललेल्या मोगऱ्याच्या कळ्यांपासून बनवलेल्या डझनभर गजऱ्यातून फक्त दोन गजरे घेतल्याने देखील त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर लहानसे हसू उमलले. […]
जकार्ता विमानतळावर फक्त एअर इंडियाच्या विमानासाठी भारतीय जमा होतं होते. भारतीय दूतावासातील कर्मचारी आपुलकीने सहकार्य आणि मार्गदर्शन करत होते. इंडियन नेव्हीचे एक कमांडर स्वतः अडचण असलेल्या प्रवाशाला शांतपणे ऐकून आणि समजून घेत होते तसेच त्याची समस्या दूर करत होते. भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर भारतात परतण्यासाठी आतुर असलेल्या तणाव ग्रस्त भारतीयांशी आपुलकीने आणि सहजतेने वागतानाचे भावनात्मक क्षण पाहून भारावल्यासारखे झाले होते. […]
दोन दिवस झाल्यावर सोसायटीतील सगळ्या लोकांना मी आलीय हे समजल्यावर मला माझ्या घरातून निघून 14 दिवस दुसरीकडे सोसायटी बाहेर राहायला जाण्यासाठी मागणी करू लागले. 14 दिवसांनी टेस्ट केल्यावर कोरोना कॅरीयर नसल्याचे सिद्ध केल्यावर सोसायटीत येण्यासाठी सांगितले. त्यांच्या या मागणीवर मी त्यांना तशाप्रकरची माझ्या नावे नोटीस काढायला सांगितली परंतु तशी नोटीस देणे बेकायदेशीर असल्याने ते तावातावाने निघून गेले. […]
तेलवाहू तसेच केमिकल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या अकोमोडेशन वर मोठ्या आकारात नो स्मोकिंग ही सूचना लिहलेली असते. लहानपणापासून मुंबईहुन मांडव्याला आणि अलिबागला जाताना लाँच मधून जाताना मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या जहाजांवर एवढ्या मोठ्या अक्षरांत नो स्मोकिंग का लिहलंय याबद्दल प्री सी ट्रेनिंग कोर्सला जाईपर्यंत नेहमीच कुतूहल वाटायचं. […]
मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions