नवीन लेखन...
प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

टच स्क्रीन

बहुतेक सर्व जहाजांवर एकच मेन इंजिन असते. हे मेन इंजिन जहाजाच्या नेव्हीगेशनल ब्रिज, इंजिन कंट्रोल रूम तसेच प्रत्यक्ष इंजिन जवळील कंट्रोल वरून चालू करता येते. पुढे जाण्यासाठी अहेड मुव्हमेन्ट आणि मागे किंवा रिव्हर्स येण्यासाठी अस्टर्न मुव्हमेन्ट असा शब्द प्रयोग केला जातो. जहाज सुरु करून त्याचा वेग कमी जास्त करण्यासाठी इंजिन कंट्रोल कॉन्सोल नावाचा एक लिव्हर असतो ज्याला अहेड आणि अस्टर्न म्हणजेच पुढे आणि मागे नेण्यासाठी डेड स्लो, स्लो, हाफ आणि फुल्ल तसेच मॅक्स फुल्ल अशा दोन्हीही बाजूला इंजिनचा स्पीड सेट केलेला असतो. […]

मेडिकल साइन ऑफ

हळू हळू महंमद बसलेले बास्केट एकदाचे खाली जायला सुरवात झाली. बास्केट खाली जात असताना दोलका प्रमाणे हलत असल्याने जहाजाच्या बाजूवर येऊन आदळते की काय असे वाटत होते पण केवळ अर्ध्या फुटांवरून ते दुसऱ्या बाजूला जात असल्याने अधांतरी लटकलेला महंमद सुमारे साडे तीन तासांनी खाली बोटीत कसाबसा एकदाचा उतरला. मेडिकल साइन ऑफ होऊन घरी जाण्याकरिता जहाजावरुन उतरल्यावर सगळ्यांना हात करून निरोप घेऊन तो बोट मध्ये बाहेर एका बाकड्यावर बसला. […]

इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर

मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणजेच ई टी ओ ही रँक पूर्वी इलेक्ट्रिकल ऑफिसर किंवा ई ओ अशी होती. हल्ली नवीन जहाजांवर आधुनिकीकरणामुळे ऑटोमेशन, कॉम्पुटर आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड सिस्टीम आल्यामुळे इलेक्ट्रिकल ऑफिसर्स ना सुद्धा सक्षमता परीक्षा किंवा कॉम्पेटँसी एक्झाम द्यावी लागते. ही परीक्षा सुरु झाल्यापासून इलेक्ट्रिकल ऑफिसर हे इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणून जहाजावर जॉईन होत आहेत. […]

फ्युचर व्हिजन

चीफ इंजिनियरने वयाची पन्नाशी ओलांडली होती. पंचवीस वर्षांपेक्षा जास्त सर्व्हिस झाल्यामुळे, मुंबईत तीन कोटी पर्यंतचे दोन फ्लॅट्स, बी एम डब्लू, नोकर चाकर, मुच्यूअल फंडस्, मोक्याच्या ठिकाणी घेतलेले वाणिज्यिक गाळे त्यातून मिळणारे लाखो रुपयांचे भाडे अशी करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीचे त्याच्याकडून नेहमी वर्णन ऐकायला मिळायचे. […]

वॉटरटाईट डोअर्स

जहाजावर सगळ्या टाक्या किंवा जिथे जिथे बाहेर जाण्यासाठी दरवाजे असतात त्यांना वॉटर टाईट डोअर्स असे म्हणतात. वॉटर टाईट म्हणजे जहाज बुडाले तरी आत अकोमोडेशन किंवा एखद्या स्टोअर रूम मध्ये पाणी येऊ नये एवढे मजबूत दरवाजे असतात. मजबूत असल्याने ते खूप वजनदार आणि भारी भक्कम असतात. जहाज हेलकावत असताना हे दरवाजे अत्यंत काळजीपूर्वक उघडावे लागतात, वाऱ्यामुळे किंवा जहाजाच्या हेलकावण्यामुळे हे दरवाजे बंद होताना जोरात आदळले जातात. सेकंड मेट घरी जाण्याच्या तंद्रीत असल्याने अप्पर डेक मधून आत अकोमोडेशन मध्ये येताना त्याचे थोडेसे दुर्लक्ष झाले, एक पाय बाहेर असताना वॉटर टाईट डोर जहाज हेलकावल्या मुळे एवढ्या जोरात आदळले की सेकंड मेटला दरवाजावर नियंत्रण ठेवता आले नाही. दरवाजा आदळून बंद होत असताना त्याचा डावा पाय बाहेर होता आणि परिणामस्वरूप त्याच्या पायावर वॉटर टाईट डोअर एवढ्या जोरात आदळला की पायाचे हाड मोडल्याचा त्याला स्वतःलाच आवाज आला. त्याच्या तोंडातून जोरात किंकाळी निघाली ती ऐकून पायलट माघारी फिरला आणि त्याने सगळा प्रकार बघून ब्रिजवर कॅप्टनला वॉकी टॉकी वर कॉल करून ताबडतोब माहिती दिली. […]

बंकर बार्ज अ‍ॅंड ब्लॅक मनी

माझ्या दुसऱ्या जहाजावर मी फोर्थ इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो. जहाजासाठी लागणारे इंधन ज्याला शिपिंग इंडस्ट्री मध्ये बंकर फ्युएल असे सुद्धा म्हटले जाते, यामध्ये हेवी फ्युएल ऑइल म्हणजे क्रूड ऑइल पेक्षा थोड्या चांगल्या प्रतीचे ऑइल, जे रिफायनरी मधून फिल्टर होणारे काळे तेल असते ज्याला इंजिन मध्ये वापरण्याअगोदर जहाजावर प्यूरिफाय करून त्यातील पाणी आणि कचरा वेगळा करून सुमारे 125 °c पेक्षा जास्त गरम करावे लागते. तसेच डिझेल किंवा मरीन गॅस ऑइल अशा प्रकारच्या इंधनांचा समावेश असतो. […]

रामायण ऑनबोर्ड

त्यावेळेस जहाजावर इंटरनेट आणि फोनची सुविधा आमच्या त्या जहाजावर उपलब्ध नव्हती. जहाजावर कामावरून सुट्टी झाली आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणे आटोपली की एकमेकांशी गप्पा मारणे, हिंदी गाणी किंवा पिक्चर बघणे याशिवाय मनोरंजन करण्यासाठी इतर काही साधने नव्हती. आमच्या बत्ती साबकडे महाभारत आणि रामायण या दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे भाग असणाऱ्या डी व्ही डी होत्या. संध्याकाळी साडे सात वाजता क्रू स्मोक रूम मध्ये टी व्ही वर रामायण ची डी व्ही डी लावली जात असे. रोज एक एक भाग बघितला जायचा. […]

मेडिटेरेनियन आयलंड

संपूर्ण बेटाच्या चारही बाजूला उंचच उंच कड्याप्रमाणे सरळसोट कडा उभा होता. स्वच्छ आणि निळेशार पाणी त्या खडकावर आदळून फेसाळत होते. पांढऱ्या शुभ्र बुड बुड्यानी बेटाभोवती एक वलय निर्माण झाल्यासारखे दिसत होते. जहाज जसं जसं पुढे सरकत होते तस तसे बेटाचे सौंदर्य आणखीनच खुलत चालल्या सारखे दिसत होते. सगळे खलाशी आणि अधिकारी बाहेर येऊन निसर्गाचे अनोखे सौंदर्य न्याहाळत होते. कॅप्टन ने चीफ इंजिनियर ला विचारले, बडा साब आपण ह्या आयलंड ला एक फेरी मारू या का? वीस मिनिटे जातील थोडा स्पीड कमी करावा लागेल, पण तुम्ही हो म्हणत असाल तरच. लगेचच चीफ इंजिनियर ने स्पीड कमी करतोय म्हणून इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन करून सांगितले. […]

लाईफबोट

लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते. लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते. […]

एजन्ट

बरेच जणांना प्रश्न पडतो की आम्ही जहाजावर कसे जातो किंवा जहाजावरुन घरी कसे येतो. आम्हाला घ्यायला किंवा सोडायला जहाज मुंबईत किंवा भारतात येते का किंवा कसे. मी असलेले एकही जहाज आजपर्यंत मुंबई काय भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये आलेले नाही. फक्त एकदाच सिंगापूरहुन गल्फ मध्ये जाताना भारतीय सागरी हद्दीतून काही तास गेले आहे. जिथे जहाज असेल तिथे आम्हाला पाठवले जाते. मग ते जहाज परदेशात असो किंवा भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये असो. जहाज ज्या देशात असेल तिथला विजा, इमिग्रेशन किंवा ईतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच जहाजावर पाठवले जाते तसेच जहाजावरून घरी पाठवले जाते. जहाजावर जसे कोणाला तरी रिलीव्ह करायला जावे लागते तसेच कोणी रिलिव्हर आल्याशिवाय जहाजावरुन खूप दुर्मिळ वेळा परत यायला मिळते. दुसरा कॅप्टन आल्याशिवाय सध्याचा कॅप्टन जाऊ शकत नाही तसेच पॅम्पमॅन आणि फिटर यांच्यापैकी एखादा खलाशी सुद्धा रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ शकत नाही. […]

1 7 8 9 10 11 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..