निरुपण
आपल्याला आयुष्यभर विश्वात, आसमंतात, अवकाशात असलेल्या सजीव..निर्जीव प्राणीमात्र आणि अणु _रेणू यांच्या मुलभूत घटकांबद्दल सारं सारं काही जाणून घेण्याची जिज्ञासा असते..नव्हे या साऱ्या ज्ञानाचा ठेवा जास्तीत जास्त आणि सर्वात पहिले आपल्याला मिळण्यासाठी प्रत्येकाची चढा ओढ चालू असते..माणसाची हि जिज्ञासा माणसाच्या युगानुयुगे चालेलेल्या प्रवासात मैलाचे दगड होऊन माणसाचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी दिशादर्शक बनून अजरामर झाल्याचे आपल्याला इतिहासातील प्रत्येक पानावरील नोंदीत आढळून येते. […]