ज्ञानेश्वरी: जीवनाचे मॅन्यूअल: परिचय
ज्ञानेश्वरांना माणूस फार अचूक कळला होता. या माणसाला जगवण्यासाठी काय ज्ञान द्यावे लागेल हे त्यांना फार चांगले उमगले होते. यामुळेच त्यांनी वेदांमधून कडसून काढलेल्या भगवदगीतेचा भावार्थ सांगायचे ठरवले असावे. तो भावार्थ असावा, अनुवाद नसावा हा त्यांच्या प्रज्ञाचक्षुंचा दूरगामी निर्णय. […]