MENU
नवीन लेखन...
राजेश जगताप
About राजेश जगताप
मी एक नवोदित लेखक आहे. माझ्या कथा नियमितपणे "बोलती पुस्तके by Patil sir" या युट्यूब चॅनल वर ऑडिओ स्वरूपात सादर केल्या जातात.. माझे " विळखा The Trap " आणि " आनंदी " हे दोन कथासंग्रह प्रस्तावित आहेत.

बापाचं मन

एक बाबा थकलेला कमरेमध्ये वाकलेला हातात काठी तुटका चष्मा उदासवाणा बसलेला अंगावर सुरकुत्या चुरगळलेल्या स्वप्नांच्या फाटकं धोतर फाटका सदरा अनवाणी चाललेला..! कधीकाळचा सूर्य आज निस्तेज झाला आहे करपलेल्या मनाचा एक कोपरा ओला आहे डोळ्यांवर हात ठेवून वाट अजून पाहतो आहे येईल कधीतरी लेक माझा शहरात राहतो आहे..! वाट पाहून वाटा सरल्या नवी वाट दिसत नाही काळोखात […]

ओझं

जड झाला जीव आता ओझं सोसवत नाही… भोग भोगायचे किती आता देवादारी बसवत नाही…! जन्म वाया गेला राबण्यात नाही गाव दुसरं पाहिलं.. भरल्या गोकूळ घराचं सपान मनात राहिलं..! वाट एकटा चालला तिला जोडीला घेतलं.. एक नातं विश्वासाचं त्याच्या जिवावर बेतलं…!! …. राजेश जगताप, मुंबई ९८२१४३५१२९.

नातं

काय होतं कुणास ठाऊक देवासंग नातं अनवाणी चालत कुत्रं वारीला गेलं होतं पाऊसपाण्यात जरी भिजलं होतं अंग विठ्ठलाच्या गजरात तरी झालं होतं दंगं…! चंद्रभागेच्या पाण्यात अंग ओलं केलं मनात घेऊन वेडा भाव पायरीशी गेलं दारामागच्या देवाला भेटणार तरी कसं माणसांपुढे बिचा-याचं झालं होतं हासं.! माणसाचा देव माणसांसाठी असतो ज्याच्या खिशात पैसा त्यालाच तो दिसतो पायरीवर बसून […]

माझा प्रेमविवाह

तिचं मा़झं प्रेमप्रकरण जेव्हा तिच्या घरी माहित पडलं बोलणं भेटणं बंद करून तिनं मला एक पत्र धाडलं..!! दारात उभा राहून तिच्या मी म्हणालो तिला चल राणी येशील का आठ दिवसांची मुदत मिळालीय खरंच सांग मला नेशील का…!! एका विवाहमंडळात डायरीतली तारीख पाहून मुहुर्त ठरला.. नातेवाईक दोघांचेही नव्हते म्हणून मामाचा मळवट भटजीनेच भरला..!! हळद नव्हती मेंदी नव्हती […]

बापाची जागा

अरे माझी माय .. माझी माय .. म्हणून सगळेच बोंबलतात बाप तुमचा मेलाय काय…? आईनं जन्म दिला आईनं वाढवलं बापाचं योगदान काहीच नाही काय ? रडत होती पण लढत होती बरंच सोसावं लागलंय तिला बापाचा हात पाठीवर होता म्हणून लढली कधी तरी विचारा तिला.! आईच्या डोळ्यातलं पाणी आणि दाटलेले हुंदके सगळ्यांना दिसतात अरे दिसले नाही कधी […]

सावज (कथा)

सोसायटीच्या वॉचमननं झोपेनं तारवटलेले डोळे अर्धवट उघडून एक कडक सॅल्युट ठोकला.. सिक्युरिटी कॅबिनच्या दाराजवळ अंगाचं मुटकुळं करून पडलेलं कुत्रं उठलं .. शेपूट हालवित त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहू लागलं.. मराठेंनी खिशातून एक बिस्कीटचा पुडा काढला.. त्यातील काही बिस्कीटं.. त्याच्यासमोर धरली.. त्यानं पुढील पाय किंचीत उंचावून ती तोंडात धरली.. एका बाजूला ठेवून खाऊ लागलं.. उरलेल्या बिस्कीटांचा पुडा त्याच्या जवळ ठेवून म्हणाले.. […]

देवाची करणी

… देवाची करणी… नारळात भरलं पाणी तुझीच रे करणी आभाळाला नाव तुझं देवा.. तुझीच रे धरणी..!! दिवे लाखो चांदण्याचे चंद्र तुझा लामणदिवा उजेडाच्या दुलईवर खेळ खेळतसे हवा.. चुलीतली आग भरी पोट कशी नेतोस रे तरी सरणी..!! जग पाखरांचे वेडे फुलपाखरू कोषातून घडे.. पाण्यातल्या माशांना देतो पोहण्याचे कोण धडे.. जोंधळ्याचे भरले गोंडे.. उसात कशी साखरेची केली पेरणी..!! […]

कॉन्ट्रॅक्ट (कथा)

सरकारचा आदेश निघाला.. देशाच्या पंतपरधानानं सवता टीव्ही वर येऊन १८ तारखीपासून पुढं दोन आठवडे कोणी बी कामाबिगर घराबाहेर निघायचं न्हाई.. घोळका करून उभं राहायचं न्हाई..घोळक्यानं कुठं जायचं न्हाई का यायचं न्हाई.. बाहीर जाताना तोंडावर कापडाची पट्टी म्हणजी मास्क का काय ते बांधूनच जायाचं.. आसं सांगितलं.. […]

आनंदी

आये…वासुदेव आलाय गं…म्हणंत पळत पळत आंगणात गेलो.बाहेर झुंजूमुंजू झालं व्हतं.. आंगणातल्या नींबाच्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू व्हता.. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..