सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
असो. विषय वासाचा आहे. नाकाला सुगंध न येणे हे कानाला संगीत न कळण्या इतकेच दुर्दैवी आहे. आणि हे दोन्ही एका व्यक्तीत एकवटणे म्हणजे दुर्दैव-परमावधीच म्हणायची. सकारात्मकच बोलायचे असेल तर वास न येणे याचेही वेगळे फायदे असतातच. असो. पण विषय (सु)गंधगप्पांचा आहे. मूलतः ‘सुगन्धिं पुष्टिवर्धनम्’ हा शब्द समुच्चय महा-मृत्युंजय मंत्रातील महेश्वराला उद्देशून असला तरी मोठा मौलिक आणि मानवी मनाला मोहविणारा, जवळचा आहे हे त्रिकालाबाधित सत्य – म्हणूनच केवळ हा गंध पुराण-प्रपंच. […]