एका प्राचीन तलावाचं चरित्र
रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले. […]