बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १६ – सावरकर व समर्थांची साम्यस्थळे
रामदास व सावरकर या दोघानी लहानपणी बलोपासना केली. समर्थ रामदास रोज बाराशे नमस्कार घालीत तर सावरकर जोर बैठका , पोहणे,धावणे डोंगर चढणे असा व्यायाम करीत. त्यामुळे दोघांचेही शरीर काटक व सोशीक बनले होते. लहानपणी दोघेही देव भक्त होते. मोठेपणी दोघांनाही खरा देव कोणता याची ओळख पटली. […]