बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ६ – सावरकरांची कर्तव्यनिष्ठा
देशसेवेच व्रत सावरकरांनी वयाच्या १६व्या वर्षीच शपथेवर घेतले. त्यांची मीमांसा करताना ते सांगतात. ”चापेकरांचे कार्य पुढे कोणीतरी चालवायला हवे मग ते मी का चालवू नये? इतरानाही ते कार्य करावेसे वाटत असे पण काही कारणास्तव ते करू शकत नव्हते मग मीच ते का करू नये?” देशाचा झेंडा पुढे नेता यावा म्हणून क्रांतिकारकांच्या मार्गातील काटे साफ करायला कुणी तरी सेपार्स एंड मायानर्स हवे असतात ते कार्य आपलेच समजून आम्ही पुढे सरसावलो” […]