नवीन लेखन...
Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

सिनेमा बनताना – दो बिघा जमीन

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या  देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता. […]

सिनेमा बनताना – बॉम्बे टू गोवा

”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना  त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल. […]

उत्कृष्ट अभिनेता -संजीव कुमार

संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे  व देहबोलीतून.नया दिन नई  रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा  संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला. […]

अष्टपैलू अभिनेता – ओम प्रकाश

त्यांचा अभिनय इतका सशक्त होता की त्यांना भूमिकेची लांबी बघायची गरज भासली नाही. चरित्र भूमिकेचे ते बादशाह होते. त्यांच्या काही चरित्र  भूमिका इतक्या ताकदीच्या होत्या की त्या चित्रपटांचे तेच हीरो होते. अन्नदाता, बुढा मिल गया हि त्याची उदाहरणे, साधू और शैतान मधील खजानजी,गोलमाल मधील इन्स्पेक्टर, पडोसन मधील मामा,चमेली की शादी मधील कुस्ती  वस्ताद, नामक हलाल  मधील ददु,शराबी मधील मुनशी  जंजीर मधील अमिताभला निनावी टीप देणारा डि सीलव्हा,आणि चुपके चुपके मधील जिजाजी कोण विसरेल. […]

हरहुन्नरी गीतकार संवाद लेखक-राजेंद्र कृष्ण

१९४८ गांधीहत्येनंतर त्यांनी “सुनो,सुनो,ऐ दुनियावालो बापूजीकी अमर कहानी” गाणे लिहिले जे रफिसाहीबानी गायले होते संगीत होते,हुस्नलाल भगतराम यांचे. ते प्रचंड गाजले. “बडी बहन” ची गाणी खूप गाजली.त्याबद्दल निर्मात्याने  त्यांना ओस्तिन कार  भेट दिली.त्यांनी हिंदीतल्या जवळजवळ सगळ्या संगीतकाराबरोबर काम केले.हुस्नलाल भगतराम पासून ते आर.डी.बर्मन पर्यंत.एका झटक्यात गाणी लिहिणे हा त्यांचा हातखंडा होता. त्यांची गाणी लिहिण्यावर इतकी हुकुमत होती कि ते लिहायला कागद नसेल तर पाच मिनिटात सिगारेटच्या पाकिटावर गाणे लिहित असत.. […]

जयदेव- एक दुर्दैवी संगीतकार

  एक दावा काही लोकं कायम करतात कि तुमच्याजवळ जर प्रतिभा, हुनर असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणी अडवू शकत नाही मग जयदेवजवळ काय नव्हते जे इतर संगीतकारांकडे होते. ज्यांना फक्त दुर्दैवाने साथ दिली? ४२ चित्रपटाना संगीत देऊनही एका खोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहायची शिक्षा मिळाली. 3 ऑगस्ट 1918 ला नैरोबीत जन्मलेल्या जयदेवनी कुटुंब लुधियानात स्थायिक […]

हिन्दी सृष्टीतील फाईट मास्टर- शेट्टी

हिंदी सिनेमा सृष्टीत अनेक फाईट मास्टर झाले पण त्यात सर्वात नावाजलेला होता शेट्टी. कारण तो फाईट मास्टर शिवाय अभिनेता सुद्धा होता.त्याचे नाव होते मुद्दू बाबू शेट्टी. तो मुळचा मंग्लोरचा.लहानपणी त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. म्हणून त्याच्या  वडिलांना काळजी होती. त्यांनी त्याला मुंबईला पाठवले.त्यावेळी तो केवळ 9 वर्षाचा होता.मुंबईला आल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. त्याला कॉटन ग्रीन येथे टाटाच्या canteen मध्ये वेटरची नोकरी मिळाली.जेवण व थोडे पैसे याची सोय झाली.प्रसिद्ध जिम्नॅस्टिक् के.एम.मंडन याची भेट झाली.शेट्टीची शरीरयष्टी बघून त्यांनी त्याला बॉक्सिंग चे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्यात तो चम्पिअन बनला.सलग आठ वेळा त्याने मुंबईतील बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली.याच वेळी अभिनेता भगवान यांची नजर त्याच्यावर पडली.त्यांनी शेट्टीला बोलावले व त्यांचे सहकारी बाबुराव पहेलवान यांच्या बरोबर फाईट सीन घेतले व त्याला 200 रुपये दिले. […]

डोळ्यासमोर आई वडिलांची हत्या पाहणारा गीतकार -गुलशन बावरा

गुलशन बावरा यांनी कायम हसती खेळती गाणी लिहिली. पण बालपणाच्या प्रसंगाची व्यथा त्यांना कुठे तरी सलत होती म्हणूनच त्यांनी जंजीर मधले “ बनाके क्यू बिगाडा , बिगाडा रे नासिबा उपरवाले “ हे गाणे लिहिले. त्यांनी अनेक संगीतकाराबरोबर काम केले. पण त्यांचे जास्त  सूर जुळले ते कल्याणजी आनंदजी व आर.डी बर्मन यांच्या बरोबर. त्यांनी जवळ जवळ २४० गाणी लिहिली. त्यांनी हौस म्हणून जवळ जवळ १५ चित्रपटात काम केले.(जंजीर चित्रपटाच्या “दिवाने है दिवानोको न घर चाहिये “ या गाण्यात रस्त्यावर पेटी वाजवताना दिसतात.) […]

निर्मात्याचे संगीतकार – कल्याणजी आनंदजी

कल्याणजी आनंदजी हे निर्मात्यांचे संगीतकार होते.असे म्हणण्याचे कारण ते निर्मात्याला हवे आहे तसे देत असत.थोडक्यात ते बनिया वृत्तीचे होते.आणि स्वताला बनिया म्हणवून घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. […]

एक रुबाबदार अभिनेता – विनोद खन्ना

गुलजार आपल्या पहिल्या मेरे अपने  चित्रपटासाठी एका वैफल्यग्रस्त तरुणांच्या भूमिकेसाठी शोध घेत होते. त्याच वेळी त्यांची नजर विनोद खन्नावर गेली. त्यांनी त्याला ती भूमिका दिली. त्याच्या या कामाला मिनाकुमारीने सुद्धा दाद  दिली. […]

1 5 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..