नवीन लेखन...
Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

बॉम्बे टॉकीजची राणी – देविका राणी

हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर बॉम्बे टोकीज फुटली शशधर मुखर्जी व अशोककुमार त्यातून बाहेर पडले.तरी देविका डगमगली नाही सहायक दिग्दर्शक अमिया चक्रवर्तीला घेऊन चित्रपट काढले १९४५ साली “ज्वारभाटा” काढला. त्यावेळी चक्रवर्तीने “युसुफ खान”नावाच्या एका फळविक्याला आणले. देविका म्हणाली हे नाव चालणार नाही म्हणून त्याचे दिलीपकुमार असे बारसे केले. […]

गझलचा बादशाह – मदन मोहन

मला तर वाटते कि मदन मोहन यांनी लताच्या आवाजाचा जितका सुंदर उपयोग करून घेतला तितका इतर संगीतकारांनी फार कमी करून घेतला.”कदर जाने ना “ हे गाणे ऐकून तर बेगम अख्तर सुद्धा चकित झाल्या फारसे शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसून कसे रागदारीवर गाणे केले. […]

समांतर व व्यावसाईक चित्रपटाचा समन्वय- बिमल रॉय

ज्या काळात हिंदी चित्रपटात कलात्मक सिनेमा हे नावही अस्तित्वात नव्हते त्याकाळात व्यावसायिक व कलात्मक चित्रपटाचा उत्तम संगम ज्याने साधला ते होते बिमल रॉय. त्यांनी मी कलात्मक चित्रपट निर्मितो असा धिंडोरा पिटला नाही.ते म्हणत मी अतिशय सामान्य कलाकार आहे.मला वाटते कि मी हे  लोकांसमोर मांडावे असे वाटते,  ते मी चित्रपटामधून मांडतो. […]

हृषीकेश मुखर्जी – एक दर्जेदार दिग्दर्शक

आजच्या  जमान्यात कमर्शिअल आणि समांतर सिनेमे असे सरळ सरळ दोन भाग सिनेपत्रकार पाडतात पूर्वी असे नव्हते.एक तर चांगला सिनेमा किंवा वाईट असे दोनच प्रकार असत. तरीही कमर्शियल व समांतर सिनेमाचा समन्वय साधला तो बिमल रॉय व त्यांचा चेला ऋषिकेश मुखर्जी यांनी.  […]

गाणी बनतानाचे किस्से

प्रत्येक गाणे नशीब घेऊन जन्माला येते. काही गाणी गाजतात तर काही विस्मृतीत जातात.तर काही किस्से बनून जन्माला येतात.एकाच  गाण्याच्या किस्याबद्दल काही लोकांच्या वेगवेगळ्या आठवणी असतात.  त्यातलीच काही गाण्याचे किस्से […]

कोकण

कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते.चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो.माती लाल,रस्ते लाल,पाणदी लाल, चिर्याची घरे लाल,  कौले  सुद्धा लाल,झाडांची पाने आपला मुळचा रंग दडवून   लाल झालेली असतात. […]

तीस लाख ज्यूंचा बळी घेणारा कर्दनकाळ

….पण याच छोट्या ज्युने भविष्यात एक दोन नव्हे तर तीस लाखाहून जास्त ज्यूंची निर्दय हत्या केली होती. या छोट्या ज्युचे नाव होते, एडॉल्फ आइकमन.आणि योगायोग म्हणजे याच शाळेत सतरा वर्ष आधी हिटलर शिकत होता. […]

हिरोशिमावर बॉम्ब टाकून वेडा झालेला वैमानिक – क्लौड इथेर्ली

हिरोशिमाच्या आकाशात दोन विमाने घिरट्या घालत होती. एका क्षणात त्यातल्या एका विमानातून अणुबॉम्ब हिरोशिमा शहरावर पडला. प्रचंड मोठा स्फोट झाला आणि मशरूमच्या आकाराचा आगीचा लोळ आकाशाकडे झेपावला. त्या आधीच ती दोन्ही विमाने हिरोशिमाच्या बाहेर पडली. त्या दोन विमानापैकी एक वैमानिक होता पौल तीबेट्स  व दुसरा वैमानिक होता क्लौड इथेर्ली (Claude Eatherly). […]

एडी चापमन – ब्रिटीशांचा विमानाचा कारखाना उध्वस्त करणारा ब्रिटीश गुप्तहेर

लेखाचे शीर्षक विचित्र वाटेल  पण, एडी चापमन विषयी जाणून घेण्याआधी आपण डबल एजंट म्हणजे काय हे जाणून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले. […]

दुसऱ्या महायुद्धातील झुंजार रणरागिणी – व्हायोलेट झाबो

दुसऱ्या महायुद्धात जसे गुप्तहेर संघटनेत पुरुष होते,त्यांच्या खांद्याला खांदालावून लढणाऱ्या स्त्री गुप्तहेर सुद्धा होत्या.त्यातील एक  व्हायोलेट. […]

1 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..