हसण्यावारी नेऊ नका
आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो. […]