टॅक्सी नंबर
समर चे वडील म्हणजेच किशोरीलाल पाठक हे शिस्तीचे दुसरं नाव होतं. भरतपूर मधल्या सरिता आश्रम आणि त्या आश्रमाच्या शाळे साठी त्यांनी आपलं उभ आयुष्य वेचलं होतं. शाळेत गणित आणि शास्त्र हे विषय शिकवताना त्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास आणि शिस्त हेच दोन मार्ग अवलंबले होते.. अर्थात शाळेच्या ह्या शिस्ती मध्ये घरात देखील एकुलत्या एक समर साठी कसली ही सवलत नसायची , जो अभ्यास आणि शिकवण शाळेतील इतर मुलांसाठी होती तीच समर साठी असायची . […]