मृगजळ
एका अर्थाने ते खरं ही होतं म्हणा, कारण रोज सकाळी सहा वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी दोन्ही मुलांच्या म्हणजे श्रुती आणि शिरीष यांच्या अनुक्रमे कॉलेज आणि शाळेच्या डब्या च्या तयारी ने, राकेश एम आय डी सी मध्ये एका ऑटोमोबाईल कंपनीत होता त्यामुळे त्याला वेग वेगळ्या शिफ्टस प्रमाणे जावं लागायचं, तेव्हा त्याचा डबा वेगळा, आर्थिक परिस्थिती यथा तथा च असल्याने सर्व घर काम तिच्यावरच होती, त्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ टेके पर्यंत तिचा कामाचा सपाटा सुरूच असायचा . […]