वाळकेश्वरची पाटी
वाळकेश्वरच्या सुप्रसिद्ध रस्त्यावरील ‘तीन बत्ती’ तिठ्यापाशी वाळकेश्वर या ऐतिहासिक परिसराची माहिती देणारा एक स्टीलचा फलक एका खाजगी संस्थेने लावलेला आहे. या फलकावरील मराठी भाषेतील माहिती, माननीय राज्यपालांचे जन संपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. या पाटीवरील लिखाणासाठी माझं नांव त्या पाटीवरील माहितीखाली लिहून मला श्रेयही देण्यात आलं आहे. श्री. उमेश काशिकरांच्या या औदार्याबद्दल मी त्यांचा आणि त्या संस्थेचा आभारी आहे..! दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची अहमिहीका लागलेल्या आजच्या दिवसांत असं औदार्य दुर्मिळ आहे आणि म्हणून त्याची किंमत मोठी आहे.. […]