पद्मावती
मला वाटतं, आपल्याला भन्सालींसारख्या नतद्रष्टांना धडा शिकवण्यासाठी, आपण त्यांच्या चित्रपटावर वा कलाकृतींवर अशी बंदीची मागणी न करता, असे चित्रपट आपण कोणी पाहायचेच नाहीत असं ठरवावं. लोकशाहीत कोणत्याही विषयावर चित्रपट काढायला किंवा भाष्य करायला बंदी नाही. याला अविष्कार स्वातंत्र्य असं म्हणतात. त्याच लोकशाहीत तो चित्रपट पाहायलाच हवा असंही बंधन नाही. मग आपल्या हातात हे घटनात्मक हत्यार असताना, आपण बंदीची मागणी का करतोय हे अनाकलनीय आहे. […]