श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.
लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण.
२०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.
माणसं सर्व सारखीच असली, तरी आपण त्यांचं अगदी सहजपणे आणि नकळतपणे वर्गीकरण करत असतो. ही आपल्या मनाला लागलेली एक वाईट सवयचं असते. मोठा माणूस, छोटा माणूस, फालतू माणूस असं वर्गीकरण करायचे काही निकष आपण, म्हणजे आपण व समाजाने ठरवलेले असतात. हे निकष म्हणजे पद, पैसा, पत आणि प्रतिष्ठा. या लेखात मी फक्त छोट्या आणि फालतू समजल्या […]
पुढे जाण्यापूर्वीच पहिला खुलासा करतो, ‘जाकिट’ म्हणजे दिल्लीच्या मोदींपासून एखाद्या फुटकळ गल्लीतला राजकारणात असलेला कुणीही वापरतो ते. आणि अर्थातच पुरुषांचेच..! अंगात, स्वत:ला शोभो अथवा न शोभो, जाकिट हा राजकारणाचा ‘युनिफाॅर्म’ झालाय हल्ली. नाक्यावर नेहेमी उभा चकाट्या पिटत उभा असलेला एखादा रिकामटेकडा, अचानक जाकिटधारी झालेला दिसला, की मी समजतो, की हा आता ‘मार्गा’ला लागला आणि त्या परिसरातल्यांची […]
काल दहावीचा निकाल लागला. जवळपास २०० च्या आसपास मुलांना १०० टक्के मार्क्स मिळाले हे वाचून खुप छान वाटलं. त्या सर्व हुशार मुलांचं अभिनंदन. या मुलांबद्दल कौतुक असलं तरीही माझ्या दुसऱ्या मनात कुठेतरी काळजीची पालही चुकचुकली. पैकीच्या पैकी मार्क्स म्हणजे कसा आणि केवढा अभ्यास केला असेल या मुलांनी, वर्षभर बाकी सर्व बाजूला ठेवून फक्त अभ्यासच केला असेल […]
(हा लेख माझ्या कालच्या ‘भ्रमर’ या लेखावर आलेल्या अनेकांच्या प्रतिसादामुळे लिहीला गेलाय.) प्रामाणिकपणा ह्या गुणाबद्दल (की दुर्गुणाबद्दल?) मला जबरदस्त कुतूहल आहे. प्रत्येकात प्रामाणिकपणा असायलाच हवा असा माझा आग्रह असतो. पण प्रामाणिक असण्यातं व्रत हे बोलायला सोपं असलं, तरी आचरणात आणायला अत्यंत अवघड असतं. अवघड असतं, अशक्य नसतं, मात्र त्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असावं लागतं. हे एक तप […]
लेखाचं नांव भ्रमर असलं, तरी भ्रमर किंवा भुंगा याच्यावर यात फार काही लिहीलेलं नाही. मला सांगायचंय ते ‘भ्रमर’वृत्तीविषयी आणि ती पुरूषाशी संबंधीत समजली जाते. लेखाला ‘पुरूष’ असं नांव दिलं असतं, तर ते बटबटीत झालं असतं म्हणून ‘भ्रमर’ म्हटलं येवढंच..!! पुरूष हा जोडीदाराशी वफादार किंवा एकनिष्ठ नसतो असं समजलं जातं आणि ते शत-प्रतिशत खरंही आहे. कुणाही स्त्रीबद्दल […]
मी जी छोटी गोष्ट पुढे सांगणार आहे, त्यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही आणि ज्यांचा बसेल, ते लोक, इतर लोकांनी त्यांना अंधश्रद्ध वैगेरे आहेत असं समजू नये यासाठी, विश्वास बसल्याचं किंवा असल्याचं कबूल करणार नाहीत. पण ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार, मला जो अनुभव आला किंवा येतो हा शब्दबद्ध करणारच मग ‘लोकांना […]
आता सध्या सुरू असलेला संप. ह्या संपात मुळात शेतकरी किती आणि राजकारणी किती हा संशोधनाचा विषय आहे. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शेतकरी आई’ कष्टाने कमावलेलं लेकरांच्या, झालंच तर घरच्या कुत्र्या-मांजरांच्या घशात घालते, पण असं माज आल्यासारखं रस्त्यावर कधीही फेकून देत नाही. आज रस्त्यावर फेकलं गेलेलं अन्न व दुध खऱे शेतकरी बाजारात विकायला निघाले होते व काही झुंडशहांनी […]
दि. ३० मेला १२वी एचएससी बोर्डाचा निकाल लागला. त्या अगोदर काही दिवस आयसीएसई बोर्डाचा निर्णय आला व त्याही अगोदर काही दिवस सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला. एकाच १२वीचे तिन तिन वेगळे रिझल्ट तिन वेगवेगळ्या दिवशी लागले. ‘बोर्डों के विविधता मे एकता’ ही घोषणा भारताच्या विविधतेच्या तालावर बोलण्याचे माझ्या कंठापर्यत येते पण मी ही राष्ट्रप्रेमाची उबळ मोठ्या कष्टाने […]
लाजेची कल्पना कालसापेक्ष असते. म्हणजे वेगवेगळ्या काळात ती वेगवेगळी असते. अजंठा-वेरूळ अथवा खजुराहो येथील शिल्प पाहीली असता, शिल्पातील स्त्रीया बऱ्याचश्या नग्न अथवा अर्ध-नग्नानस्थेत दिसतात. ‘टाॅपलेस’ असणं किंवा उरोभाग अनावृत्त असणं ही त्यातील बहुसंख्य शिल्पांत समानता आहे. कोणत्याही काळातली समाजाचे प्रतिबिंब त्या त्या काळातील लेखन-चित्र-शिल्पकलेत लख्खपणे पडलेलं दिसतं. कलाकार समाजातूनच येत असल्याने त्या त्या काळातील प्रचलित इष्ट-अनिष्ट […]
लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात कुकवापासून टिकली, बिंदी, टिका, मळवट वैगेरे कुंकवाच्या सर्व प्राचिन-अर्वाचिन पिढ्या अपेक्षित आहेत. लिहीताना मी फक्त ‘कुंकू’ असाच उल्लेख करणार आहे. आणखी एक, या लेखात फक्त’ हिन्दू स्त्री’च्या कपाळावर त्या मोठ्या अभिमानानं धारण करत असलेल्या ‘सिंदूरी सुरज’ बद्दलच बोलायचंय, पुरूषांच्या कपाळाबद्दल नाही. एक हिन्दू धर्म सोडला तर स्त्रीयांनी कपाळावर काहीही […]