नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

आपल्या मापाचे कपडे कोण शिवणार ?

निवडणूकीचा मोसम सुरू झाला आहे. सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे, वचननामे नागरीकांसाठी जाहीर करत आहेत. या सर्व ‘नाम्यां’त पक्ष काय करू इच्छितो हेच जाहीर केलेलं असतं. परंतू नागरीकांना काय हवंय याचा विचार कुणीच केलेला दिसत नाही, करतानाही दिसत नाही..! प्रत्येक वाॅर्ड मुंबईचाच हिस्सा असला तरी प्रत्येक वाॅर्डाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, असतात. एखाद्या वाॅर्डच्या गरजा काय आहेत हे […]

देवा, आम्हाला कायम दु:खात ठेव..

आपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत. रिक्शा-टॅक्सीवाले, वेटर यांच्याशी तरी कुठे लोक बोलतात..! बोलणं जाऊ देत, बघतही नाहीत कधी..वरचा माणूस खालच्या माणसाशी बहुतेक वेळा […]

किळस आलीय आम्हाला तुमची..

भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय.. असं होतंय याचं कारण यांना ‘लोकसेवा’ करायची नसून काहीही करून सत्ता व त्या सत्तेतून आपल्या पुढल्या कितीतरी पिढ्यांसाठी प्रचंड माया जमवायचीय हे सर्वांनाच कळून चुकलंय आता (तुमच्या पुढच्या पिढ्या […]

आनंद: एक वाटणं आणि वाटणं..

मन की बात.. “प्रत्येकाला आपण आनंदात असावं असं वाटणं हा मनुष्यस्वभाव झाला व आपल्यासारखंच इतरांनीही आमंदात असावं असं वाटण ही माणुसकी झाली..” हे पुलंचं ‘पाचामुखी’ या पुस्तकातलं वाक्य. किती गहन अर्थ भरलाय या वाक्यात..! पण होतं काय, की आपण ते वाचतो, पांच मिनिटं भारावल्यासारखं होतो आणि पुन्हा मी, माझं सुरू करतो.. सर्व आनंदी राहावेत असं सांगणारे […]

मन की बात – DNA व Dna

DNA ( Deoxyribo Nucleic Acid). डीएनए मध्ये जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मनुष्य प्राण्यासहीत सर्वच सजीवांमधे हे घडतं. शाळेत असताना कधीतरी उत्तरापुरती घोकंपट्टी केलेली ही माहिती. कोणत्याही […]

झाड आणि इमारत !

काल एका पुस्तकात जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार श्री. चार्लस कोरीया यांचं एक वाक्य वाचनात आलं. वाक्य सांगण्यापूर्वी मुंबईतील व मुंबईची माहिती असणाऱ्यांसाठी प्रथम चार्लस कोरीयांची एक ठळक ओळख सांगतो. मुंबईतल्या दादर पश्चिमेला असलेलं ‘पोर्तुगीज चर्च’चे वास्तशिल्पी म्हणजे श्री. चार्लस कोरीया. पोर्तुगीज चर्चची वेगळीच बांधणी अगदी नवख्या माणसाची तर सोडाच, रोज पाहाणाऱ्याची नजर सारखी आकर्षून घेते यांत शंका नाही. […]

जग आणि जग..

हसून सोडून देण्यापलीकडे ह्या जगाची फारशी मोठी लायकी नाही..जगाला गांभिर्याने घेतलं की मग हे जग आपलं सरळ जगणंही उगाचंच गंभिर आणि क्लिष्ट करून टाकते.. शेवटी जग म्हणजे कोण, तर आपल्याला जी चार लोकं ओळखतात तेच आपल्यासाठी जग असतं..ही चार-दहा लोकं सोडली तर आपण कसे आहोत व काय करतोयत या विषयी इतर कुणाला काहीच कर्तव्य नसतं..पण आपण […]

केवळ राशीवरून भविष्याचा अंदाज वर्तवता येतो का?

केवळ राशीवरून भविष्याचा अंदाज वर्तवता येतो का? साडेसाती वरचे माझे दोन लेख वाचून मला अनेकांनी आपली राशी सांगून साडेसातीचा त्यांच्यावर काय चांगले-वाईट परिणाम होईल असा प्रश्न विचारला होता. सर्वाना वैयक्तिक उत्तरं देणं शक्य नसल्याने सर्वासाठी म्हणून मी हा लेख लिहितोय. जन्मावेळी आपल्या चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. त्या त्या राशीतील हा चंद्र […]

साडेसाती म्हणजे काय? -भाग २ रा ( उत्तरार्ध )

(ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त..बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..) ‘साडेसाती’ म्हणजे काय? -भाग २ रा.( उत्तरार्ध ) लेखाच्या पहिल्या भागात सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, शुक्र, गुरू व शनी प्रत्येक राशीत किती काळ मुक्कामाला असतात हे पाहिलं. शनीच्या साडेसातीकडे जाण्यापूर्वी आपण राहू आणि केतू या दोघांच्या प्रत्येक राशीतील मुक्कामाची थोडक्यात माहिती घेऊ. राहू व केतू हे खरंतर ग्रह नसून […]

साडेसाती म्हणजे काय? -भाग १ ला (पूर्वार्ध)

(ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त..बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..) ‘साडेसाती’ म्हणजे काय? -भाग १ ला. (पूर्वार्ध) काल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी […]

1 23 24 25 26 27 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..