श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.
लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण.
२०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.
उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही..पण होतं काय की, गोड आठवणी आपण चटकन विसरतो आणि कटुता मात्र हृदयाशी कवटाळून ठेवतो..व ह्या कडू […]
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हल्ली एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते.. जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या स्मार्ट मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले..आपण काय करतोय, कुठे आहोत असं ना स्वत:चं भान ना आजुबाजूचं..! गंभिर गोष्ट म्हणजे ह्याला कोणताही वयोगट अपवाद नाही.. डोळे व कान ही अतिशय महत्वाची ज्ञानेद्रीये आहेत. बाहय […]
इतिहासावर महानगरपालिकेचं अतिक्रमण..! काल बऱ्याच दिवसांनी फोर्ट विभागातील ‘काळा घोडा’ इथं जाणं झालं. तिथं गेलो आणि चमकलोच. जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारातल्या पार्कींग लांटमधे उंची गाड्याच्या पार्कींगच्या गर्दीत एका उंचं चबुतऱ्यावर चक्क एक काळ्या रंगाचा घोडा ‘पार्क’ केलेला दिसला. मला आश्चर्यच वाटलं. इथे घोडा पार्क कधी आणि कोणी केला हे कळेना म्हणून चबुतऱ्यावरची पाटी वाचण्यासाठी आणखी जवळ […]
भारतीय पत्रकारीचेचा पाया रचणाऱ्या ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन.. ‘निर्भिड पत्रकारिता’ या शब्दाला बट्टा लावण्याचं पातक अगदी गेल्याच वर्षी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या एका मराठी संपादकाकडून घडलं आणि बाळशास्त्री, टिळक, गांधी आदिंलारख्या निर्भिड आद्य पत्रकारांची मान शरमेने वर स्वर्गात खाली गेली असावी या बाबत निदान माझ्या मनात तरी काही शंका नाही..बाळशास्त्रींना तर ‘याचसाठी केला होता का […]
ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त.. बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं.. उद्या दिनांक ६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ७.३० मिनिटांनी शनी ‘धनु’ राशीत प्रवेश करेल. याचा अर्थ ‘मकर’ राशीला उद्यापासून साडेसातीचा फेरा राहिल तसंच ‘तूळ’ राशीची साडेसाती उद्या संपेल.. तूळ राशीला पुढली ३० वर्ष साडेसाती लागणार नाही..!! ‘मकर’राशीवाल्यांना पूर्ण साडेसात वर्ष, ‘धनु’राशीवाल्यांना पांच वर्ष तर ‘वृश्चिक’राशीवाल्यांना साडेसातीची अखेरची अडीच […]
आमच्या हरकुळ खुर्दतल्या मंतरलेल्या रात्री नंतरच्या रात्रीचा मुक्काम कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावातल्या जंगलात होता. आमचा इकडचा यजमान होता माझा रानवेडा मित्र डॉ. बापू भोगटे.. डॉ. बापू भोगटे हा जनावरांचा डॉक्टर. मुंबईतली चांगली ‘गोदरेज’ मधली नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात स्थायिक झाला..थोडे पैसे गुंतवून काजू, बांबूची लागवड सुरु केली..वेळ मिळेल तसा खांद्यावर बंदूक […]
एखाद्याने आपल्याकडील शिगोशिग भरलेल्या भांड्यातून वाटीभर दुध मित्राला देणं आणि त्या मित्राची कुवतच वाटीची असताना, त्या पहिल्या ‘एखाद्या’ मित्राच्या अडचणीच्या वेळेस दुधासहीत अख्खी वाटीच त्याला देऊन टाकणे, यातील त्या ‘देण्या’ला परतफेड म्हणावं की आणखी काही हे माझ्या लक्षातच येत नाहीय..यातील वाटीच्या मालकाचं देणं मोठं की भरलेल्या भांड्याच्या मालकाचं? आणखी स्पष्ट करून सांगतो. ज्याच्याकडे पोह्यांपेक्षा जास्त दौलत […]
मन आपलं धावतं कुठही कसही. मन प्रश्न निर्माण करतं आणि जीवनाला अर्थही देतं.. मन नेहमीच अननुभवी असतं असं थोरो म्हणून गेलाय.. मला यात थोडाशी भर घालावीशी वाटली. मन आपलं धावतं, कुठही अन् कसही हे खरंय..’मन वढाय वढाय, जस पिकातलं ढोरं..’ हे बहिणाबाईंनीही सांगीतलंय. मन त्याला आवडणाऱ्या जागी पुन्हा पुन्हा जातं तसं ते एखाद्या ठेच लागलेल्या जागी […]
२२ डिसेंबरला मुंबईत पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगांव या दोन स्टेशनमधील ‘राम मंदीर’ या नविन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन झाले. ‘राम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. […]
बरोबर एक वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबासहीत दिल्ली-हरीद्वार-ऋषिकेशची अक छोटीशी सफर केली होती. ट्रेनमधून जाताना दिसलेल्या जाहिरातीं व त्यातून मला उमगलेल्या तिथल्या लोकांच्या मानसिकतेवर मी एक लहानसं भाष्यही केलं होतं..ते काहीसं नकारात्मक होतं, पण चाच प्रवासात एक सकारात्मक गोष्टही घडली होती आणि मी ती साफ विसरूनही गेलो होतो. चांगल्या गोष्टी माणसं लगेच विसरतात आणि वाईट मात्र लक्षात […]