नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

टॅक्सीवाला आणि त्याने मला शिकवलेल्या दोन गोष्टी

बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. एखादा साधा सरळ आणि समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरची व्यक्ती कधी काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. अगदी अलीकडे माझ्याबाबतीत अशी गोष्ट घडली. एका साध्या टॅक्सीवाल्याने मला दोन गोष्टी अगदी सहजपणे आणि त्याच्याही नकळत शिकवल्या. त्या सांगताना त्याने कुठेही मोठा आव आणला नव्हता मात्र […]

नाविन्य शोधणं म्हणजेच ‘जगणं’

ज्या जगात आपण जन्माला आलो आहोत त्या जगाकडे आणि त्यातल्या नानाविध व्ववहारांकडे डोळे, कान आदी ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून आणि मनात अखंड कुतुहल ठेवून जगणं म्हणजेच सुसंस्कृतपणानं जगणं..! ज्ञानोबा माऊलींना अपेक्षित असलेले ‘चेतनाचिंतामणी’चं जगणं कदाचित असंच असावं असं मला वाटतं. वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं […]

देवाप्रमाणेच राज्यकर्त्यानीही मला फसवले

“…’देवावर श्रद्धा असावी” हे जवळजवळ सर्वच ध्रम-पंथं सांगत आले आहेत. मला मात्र देवाचे एकूण वागणे आमच्या आजच्या राज्यकर्त्यांसारखे वाटत आले आहे. देव दीनांचा वाली आहे आणि संकटकाली तो भक्तांच्या मदतीला धावून जातो ह्याचे पुरावे पौराणिक ललित वाड्मयाखेरीज मला कुठे सापडतंच नाहीत. तसंच राज्यकर्ते गरीबांच्या मदतीला धावून गेलेयत ह्याची वर्णनं फक्त पक्षाच्या मुखपत्रातच वाचायला मिळतात, प्रत्यक्षात बघायला […]

‘फस्ट क्लास’ डब्यातली ‘अक्कल’ आणि ‘सेकंड क्लास’ माणूसकी

मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही. आता जिथे बोलणंच नाही, तिथे भांडणं कशाला होणार? पण तरीही अधे-मधे भांडणाचे प्रसंग येतात. कारण असतं ते चढता-उतरताना धक्का लागण्याचं. […]

माहेर

डोंगराच्या कुशीत जन्म घेणारी नदी कुठल्याश्या अनावर ओढिने सागराच्या दिशेने धावत सुटते..दगड-धोंडे, काट्या-कुट्यातून वाट काढत ती सागराकडे झेपावते..डोंगर माहेर तर सागर सासर..सासरी निघालेल्या नदीला माहेराची सय सतत येतं असते आणि एखद्या वळणावर न राहावून नकळत ती माहेराच्या दिशेने वळण घेतै..माहेरी जाण्यासाठी नदी ज्या ठिकाणी वळते ते ठिकाण ‘तिर्थक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध होतं..माहेराचं हे महत्व..! नदी असो की […]

विजय मल्ल्याची कर्जमाफी आणि जनतेचा बुध्दीभेद

डीमॉनेटायझेशन नंतरचा जनतेचा बुद्धिभेद करण्याचा माध्यमांचा व राजकारण्यांचा प्रयत्न; विजय मल्ल्यांची कर्जमाफी.. कालपासून स्टेट बॅंकेने विजय मल्ल्यांचं ७ हजार कोटींचं कर्ज माफ केल्याची पोस्ट सगळीकडे फिरत आहे..हे कुणीतरी अज्ञानातून अथवा जाणून बुजून जनतेचा बुद्धीभेद करावा यासाठी करतंय अशी दाट शंका येते आणि लोकही किंचितसाही विचार न करता अशा पोस्टवर चर्चा करत बसतात व पुढे पुढे पाठवत […]

काळ्या पैशांचा उगम, नोटबंदी आणि सद्यपरिस्थिती

नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करणं गरजेचंच आहे. काळा पैसा, आतंकवाद, नकली चलन या सर्व रोगांचा एका फटक्यात नायनाट करण्याचं काम सरकारच्या या एका निर्णयानं केलं आहे. या निर्णयाचे जे काही भले बुरे परिणाम होतील ते येत्या काही काळात कळतीलंच परंतू तो पर्यंत देश खडबडून जागा झाला हे काय कमी आहे? या एका […]

स्त्री..

मी ‘स्त्री’ या विषयाकडे गमतीने परंतू गंभीरपणे बघतो..अनेक वर्षांच्या निरिक्षणातून, वाचनातून ‘स्त्री’विषयी माझं असं एक मत बनलंय.. जगातील कोणत्याही समाजात ‘स्त्री’ जन्मत नाही तर ती ‘घडवली’ जाते.. जन्म घेताना ती कोणत्याही जीवाप्रमाणे सर्वसामान्य जीवाप्रमाणेच असते मात्र तीने एकदा का जन्म घेतला, की मग त्या क्षणापासून तीला ‘स्त्री’ म्हणून घडवण्यासाठी तिच्यावर हातोडा-छिन्नीचे घाव बसायला सुरूवात होते..घर आणि […]

1 26 27 28 29 30 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..