खडा पारशी.. भाग १
मुंबई अग्निशमन दलाच्या बायखळ्याच्या मुख्यालयाच्या फ्लाय ओव्हर मागे जिथे दोन दिशांना विभागते, बरोबर त्याच बेचक्यात एक पूर्ण पुरुष उंचीचा काळा पुतळा दिसतो. पुतळा उभा आहे म्हणून तो ‘खडा’ आणि पारश्याचा आहे म्हणून ‘पारशी’. हाच तो आपला ‘खडा पारशी’..!! मुंबईत नव्याने येणारे अनेक जण मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी असलेल्या फिरोजशहा मेहता यांच्या उभ्या पुतळ्यालाही ‘खडा पारश्या’चा पुतळा समजतात म्हणून. भायखळा उड्डाण पुलाच्या बेचक्यातील पुतळा आणि फिरोजशहा मेहतांच्या या पुतळ्यात बरंच साम्य असल्याने हा गैरसमज होतो. दोन्ही पुतळे काळे, दोन्ही उभे आणि दोघंही पारशी..! […]