नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

लक्ष्मीपूजन..

आज दिवाळसणाचा चवथा दिवस. दिवाळीची चवथा दिवस म्हणजे सरत्या विक्रमसंवताचा शेवटचा दिवस.. अश्विन वद्य अमावास्येचा हा दिवस ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस.. शेतकऱ्याची दौलत, संपत्ती म्हणजे त्याचं गोधन.. कृषीसंस्कृतीतील सर्वात मोठ्या सणाच्या या चवथ्या दिवशी गांवाकडील शेतकरी गोठ्यातील गो-धनाची, शेळ्या-मेंढ्यांचीपुजा केली जाते…तर शहरात पैसा-सोनं-नाणं म्हणजे लक्ष्मी असं आपण मानत असल्याने त्यांची पूजा करतात..व्यापारीजनांचं नववर्ष उद्यापासून सुरू होणार म्हणून पुढील […]

नरकचतुर्दशी – अर्थात पहिली आंघोळ..

आज ‘नरकचतुर्दशी’.. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळसणाचा आजचा तिसरा दिवस..बहूजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस.. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले असा पुराणांमधे उल्लेख आहे. त्याची आठवण म्हणून आंघोळ केल्यावर तुळशीपाशी पायाच्या अंगठ्याने कारीट फोडण्याची प्रथा आहे. कोकणातल्या […]

वसुबारस

आज ‘वसुबारस’. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली..वसुबारस म्हणजे गाय-वासराच्या पुजेचा दिवस..ज्या गो-धनाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तीची तीच्या वासरासहीत पुजा करण्याचा आज दिवस..गाय हिन्दू धर्मात अत्यंत पूजनीय आहे, त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तीच्यापासून उत्पन्न झालेल्या बैलांशिवाय शेती अशक्य..! तीच्याप्रती कृतज्ञता म्हणूनच कृषीसंस्कृतीतील दिवाळी या सर्वात महत्वाच्या सणाची सुरूवात […]

इंग्रजी माध्यमात शिकणारी ‘मराठी’ मुलं

काल सकाळी दादर वरून लालबागला जाण्यासाठी ट्रेन पकडली..ट्रेनमधे फारशी गर्दी नव्हती..आत गेलो तर चार पोलिस शिपाई दोन पोलिस डाॅग्सना घेऊन उभे होते..मस्त राजबिंडे कुत्रे होते..एक लॅब्राॅडाॅर आणि एक लांड्या शेपटीचा डाॅबरमन..छानपैकी दरवाजात उभे होते..मी त्या शिपायांना त्या कुत्र्यांची नांवं विचारली. एकाचं ‘मार्शल’ आणि दुसऱ्याचं ‘डॅन’.. पोलिसांची आपसात चर्चा चालू होती..तेवढ्यात स्टेशन आल्याने एका पोलिसांने त्याच्याकडे असलेल्या […]

‘इंग्रजी’ माध्यमात शिकणारी ‘मराठी’ मुलं आठवली..

काल सकाळी दादर वरून लालबागला जाण्यासाठी ट्रेन पकडली..ट्रेनमधे फारशी गर्दी नव्हती..आत गेलो तर चार पोलिस शिपाई दोन पोलिस डाॅग्सना घेऊन उभे होते..मस्त राजबिंडे कुत्रे होते..एक लॅब्राॅडाॅर आणि एक लांड्या शेपटीचा डाॅबरमन..छानपैकी दरवाजात उभे होते..मी त्या शिपायांना त्या कुत्र्यांची नांवं विचारली. एकाचं ‘मार्शल’ आणि दुसऱ्याचं ‘डॅन’.. पोलिसांची आपसात चर्चा चालू होती..तेवढ्यात स्टेशन आल्याने एका पोलिसांने त्याच्याकडे असलेल्या […]

द भायखळा क्लब आणि भायखळा रेल्वे स्थानक

१६६१ सालात मुंबईत आलेल्या ब्रिटिशाना सार्वजनिक जीवनात करमणुकीची सोय नव्हती. त्यांना अशा सोयी करण्याची फुरसतही मिळाली नव्हती. इस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी असल्याने त्यांची व्यापाराची घडी बसवण्याची प्राथमिकता होती आणि करमणूक ही दुय्यम स्थानी होती. ब्रिटीश लोक हे पक्के व्यापारी आणि एकांतप्रिय म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत मात्र समान पातळीवरच्या लोकांनी विचार विनिमय करावा आणि त्यातून व्यापार […]

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा – महालक्ष्मी

मुंबईची महालक्ष्मी. तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. नवरात्रात महालक्ष्मीचा सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मीच्या देवळात हजेरी लावतात.. मुंबईतील महालक्ष्मीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे तो सारा परिसराच गर्भश्रीमंत ‘लक्ष्मीपुत्रां’ आणि ‘लक्ष्मीकन्यां’चाही..देवळाच्या समोरच पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’ मध्ये देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीच्या सारख्याच लाडक्या कन्या मंगेशकर भगिनी बंधू पंडित […]

मन की बात – कोजागिरी

देशात झालेला शिक्षणप्रसार, त्यातही इंग्रजीचा पगडा, सुलभ ट्रॅंव्हेलींग, पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव आणि तीचे अनुकरण करण्याचा आपला आंधळा प्रयत्न, जीवनाच्या सर्वच अंगांचे यांत्रिकीकरण करण्याचा हट्ट यामुळे आपल्या संस्कृतीतले मनाला आणि शरीराला पवित्र करणारे कितीतरी सण/प्रथा विकृत होत चालल्यात, लोप पावत चालल्यात..! कोजागीरी ही त्यापैकी एक.. कोजागीरी साजरी करण्यामागची पवित्र ‘अंधश्रद्ध’ कधीच लोप पावली आणि दुधाची जागा दारूने […]

रिक्षावाला आणि जयललिता

वेळ आज सकाळी १०-१०.३० ची..मी बोरीवली स्टेशनहून वजीर नाक्याकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली..रिक्षावाला मध्यमवयीन आणि तरतरीत माणूस दिसला..माझ्या नेहेमीच्या सवयीनुसार प्रथम त्याला त्याचे नाव विचारलं..आता कोणालाही कोणालाही नाव विचारलं की बरं वाटतंच, आपणही त्याला अपवाद नाही..विशेष करून ड्रायव्हर, वेटर यांसारख्या नेहेमी गृहीत धरल्या जाणाऱ्या लोकांना तर याचा खूप अप्रूप असत..सर्व्हिस मध्ये नक्की फरक पडतो..प्रयोग करून बघा.! रिक्षावाल्याने […]

काश्मिरचा माजीद हुसेन

साधारणत: चार-एक वर्षांपूर्वी कुटुंबासहीत काश्मिरला जाण्याचा योग आला होता. सोबत माझे मित्र श्री. मधू साठे आणि संजय प्रभुघाटे आणि या दोघांच्याही फॅमिली होत्या. एकूण दहा जण होतो आम्ही. तेंव्हा काश्मिरातलं वातावरण आताच्या एवढं खराब नसलं तरी टेन्स होतंच. अंधार पडायच्या आत हाॅटेलवर परतणं तेंव्हाही अनिवार्य होतंच परंतू ती सुचना कोणी गांभिर्याने घेत नव्हतं, आम्हीही घेतली नाही. […]

1 28 29 30 31 32 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..