देवगडातला पाऊस
कोकणातला पाऊस हा भयंकर देखणा असतो हे अनेकांकडून ऐकलं होतं, वाचलही होतं. मी कोकणातला पाऊस तसा पाहिलाही होता. परंतू देवगडातल्या ह्या तीन-चार दिवसांच्या निवांत मुक्कामात कोकणातला पाऊस अनुभवला.। आमच्या चारूचं हॉटेल देवगडातल्या समुद्रकिनार्यावर परंतू एका लहानश्या उभ्या कड्यावर आहे..हॉटेलच्या बाल्कनीत उभं राहीलं की समोर क्षितीजापर्यंत पसरलेला अथांग दर्या आणि दर्याच, बस्स, आणखी काही नाही..भणाणत येणाऱ्या वाऱ्याला […]