देवगडातल्या ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वर मंदिर’
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील ‘गिर्ये’ हे एक दक्षिण कोकणातील कोणत्याही गावाप्रमाणे एक निसर्गसंपन्न गाव. सुप्रसिद्ध ‘विजयदुर्ग’ किल्ला याच ‘गिर्ये’ गावात वसला आहे व त्याचे आदिलशाही अम्मलातले नाव ‘घेरिया’ हा ‘गिर्ये’चाच अपभ्रंश आहे ( ‘गिर्ये’च घेरिया झालं की ‘घेरिया’चं गिर्ये यात नेहेमीप्रमाणे तज्ञांत मतभेद आहेत. आपला तो विषय नाही.). आता इतक्या वर्षानंतर ‘विजयदुर्ग’ हे वेगळे महसुली गाव […]