श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.
लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण.
२०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.
गुरू कोणाला न्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहीलेला आहे. गुरुचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो, प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो, हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व आणखी काही जवळचे मित्र-परिचित हे आपले […]
ज्यांना मुंबईच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते किंवा ज्यांना मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असतो, त्यांना मुंबईवर लिहिल्या गेलेल्या विविध पुस्तकांचं वाचन करताना, मुंबईचा ‘राजा बिंब’ भेटतोच भेटतो. मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी स्थापन करणारा हा पहिला राजा. परंतु या बिंबाच्या नावाचा आणि तो कधी होऊन गेला, याबद्दल खूप गोंधळ आहे. बिंब राजाचा उल्लेख बऱ्याचदा ‘बिंबराजा’, ‘भिम’, […]
एकूणात गांव किंवा तिर्थयात्रा या पलिकडे त्या काळात देशाटन नव्हतं..परदेश तर खुप दुरची गोष्ट होती, आपला प्रान्त, आपला देश बघावा असंही काही फार जणांना वाटत नव्हतं. मुळात त्यावेळच्या बहुतेकांचं जग सिमित होतं. उत्पन्न मर्यादीत. एक जण कमावणार आणि दहा जण खाणार. महत्वाकांक्षाही सिमित, म्हणजे देन वेळचं जेवण, सणासुदीला एखादं लुगडं-कापड आणि मुलांची व गांवावरुन शिकण्यासाठी आलेल्यांचं शिक्षण, एवढीच. […]
खाजगी बिल्डर्स असोत, की ‘कल्याणकारी राज्य’ असं बिरुद स्वत:च्या नांवामागे किंवा नांवापुढे मिरवणारी सरकारी यंत्रणा असो किंवा ‘मुंबय नाय कुणाच्या बापाची’ म्हणत घोषणा ठोकणारे आणि स्वत:ला या मुंबईचे भुमीपुत्र म्हणवणारे आपण सर्व जण असोत, कुणाचंही अर्वाचिन मुंबई शहर आणि त्याच्या प्राचीन इतिहासाशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही, हे एव्हाना सिद्ध झालंय. कुणाचंच कुणावर नियंत्रण नाही..!! […]
मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं. […]
होय, मला सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी फसवलंय. मला आय.ए.एस., आय. पी. एस. वा तत्सम पदवीधारक अधिकाऱ्यांनीही फसवलंय. माझा साधं सोपं जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेऊन यांनी मला मोठी स्वप्न दाखवून फसवलंय. पहिलं गरीबी हटाव आणि नंतर अच्छे दिनचा नारा देऊन मला या सर्वांनी फसवलंय.. […]
आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार. […]
मला बीयश्टीच्या बसचा प्रवास खुप आवडतो. बसचे डयव्हर-कंडक्टर तर मनुष्य स्वभावाचे नमुने असतातच, पण प्रवासीही काही कमी नसतात. कंडक्टर-प्रवाशांचे होणारे वाद-संवाद तर माणूस किती प्रकारे विचार करु शकतो याचा उत्तम नमुना असतो. मला बसचा प्रवास, त्याच्या गुण-दोषांसकट, समृद्ध करणारा वाटतो. प्रवास कितीही लांबचा असो, वेळ असेल तर मी बसचाच उपयोग करतो. […]
मला वाटतं, की या मुंबईतली गेल्या चार-पाच दशकात अस्तित्वात आलेली बहुतेक प्रत्येक गोष्ट अनौरस आहे. एकेकाळच्या ‘मुंबाई’ला, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ‘मुंबाबाय’ नांवाची वेश्या बनवून तिला शांघायची लाली, कॅलिफोर्नियाची पावडर आणि सिंगापूरची सिंगापुरची टिकली लावून वेश्येच्या रुपात जगाच्या बाजारात उभी करून आणि तिच्याशी शय्यासेबत करायला देश आणि विदेशातून वखवखलेले बोलवायचे, हे गेली अनेक वर्ष सुरू आहे. […]
माणसाला देवाने जन्म दिलाय की नाही माहित नाही, पण देवाला मात्र माणसानेच जन्म दिलाय, हे पुरातन सत्य या वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळालं. यात कोणताही धर्म अपवाद नाही. देवांच्या या जन्माची आणि त्यांच्या बारशाची आणि त्यांच्या उत्सवी वाढदिवसांच्या चित्तरकथा मी सध्या लिहितोय. […]