श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.
लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण.
२०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.
आपण मराठी म्हणून ओळखले जाण्यात आपल्या भाषेचा मोठा भाग असतो. आपलं समाजातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपली भाषा टिकवणं क्रमप्राप्त होतं आणि हे टिकवण शालेय शिक्षणातूनच जास्त शक्य होतं. म्हणून आपल्या मुलांचं किमान प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून होणं आपल्यासाठी आणि त्या मुलांसाठीही महत्वाचं असतं. […]
आपली लोकशाही हि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हटले जाते. कायद्याच्या मुद्द्यावर ते बरोबरही आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास आपल्या देशात लोकशाही आहे का, हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षात आपला देश राजकीय घराणेशाहीने ग्रासलेला दिसतो. काही मोजके पक्ष सोडण्यास, याला कुणीही अपवाद नाही. […]
“आपल्या आयुष्यात दोन क्षण अतिशय शक्तिशाली असतात. यातील पहिला क्षण आपण जन्माला येतो तो आणि दुसरा आपण जन्माला का आलो, हे कळतं तो..” हे वाक्य आहे केनिया या देशातील एका तरुणाचे. त्याचं नांव बोनिफेस म्वांगी. […]
लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात जुन्या काळातल्या टिका, मळवट, कुंकवापासून ते अगदी काल-परवापर्यंत स्त्रीया-मुलींच्या कपाळावर दिसत असलेली आणि आता ती ही दिसेनासी होत चाललेल्या टिकली, बिंदी वैगेरे पर्यंतच्या, स्त्रीयांच्या भालप्रदेशी विराजमान असलेल्या कुंकवाच्या प्राचिन-अर्वाचिन अशा सर्व पिढ्या अपेक्षित आहेत. लिहिण्याच्या सोयीसाठी मी त्या सर्वांचा उल्लेख ‘कुंकू’ किंवा ‘टिकली’ असा करणार आहे. […]
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाचा कालावधी लोटला. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लहान मोठ्या संस्थांनानी बनलेला हा उभा-आडवा देश, स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात एक अखंड देश म्हणून जगासमोर आला. ब्रिटीशांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी वारशात मिळाल्या, त्यात ‘लोकशाही’ नांवाची अप्रुपाची एक गोष्टही मिळाली. […]
‘बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले ‘मेंढीकोट’..’ हे मुंबंईतील दादर, माटुंगा, वांद्रे परिसरातील रस्त्याकडेच्या भिंतींवर गेल्या वर्षभरात रंगाच्या स्प्रेने लिहिलेलं आढळून येणारं आणि कोणताही आगापिछा नसणारं, शहर वासीयांमधे संभ्रम निर्माण करणारं एक गुढ संदेशात्मक वाक्य..! मी पाच-सहा महिन्यांपूर्वी यावर एक आर्टीकलही लिहिलं होतं. […]
पत्रिका छापताना मुलासाठी केवळ ‘चिरंजीव’ आणि मुलीसाठी चिरंजीव ‘सौभाग्यकांक्षिणी’ असं लिहिलं जाताना आपण वाचलं असेल. हे असं लिहिणं प्रथेचा भाग म्हणून ते वाचून सोडूनही दिलं असेल. परंतू असा भेद का, हा प्रश्न कुणाला कधी पडतो असं मला वाटत नाही..चिरंजिवित्व आणि चिरतरुणत्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे खरंच आहे. मग पत्रिकेत ते फक्त मुलालाच का आणि मुलीसाठी ‘सौभाग्यकांक्षिणी’ असा वेगऴा शब्दप्रयोग का, असा प्रश्न मला पडला […]
नाणार येथील या प्रस्तावित रिफायनरीला ‘ग्रीन’ रिफायनरी असं गोंडस नांव दिलं गेलं होतं. मी ‘ग्रीन रिफायनरी’ची व्याख्या शोधायचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की, ‘ग्रीन रिफायनरी’ हा शब्द प्रयोग वनस्पतींपासून मिळवल्या जाण्याऱ्या तेल उद्योगासाठी करतात, खनिज तेलासाठी नव्हे. मग नाणार इथे होऊ घातलेल्या खनिज तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पास ‘ग्रीन रिफायनरी’ असं संबोधण्याचं कारण काय, हे मला समजलं नाही..रिफायनरीच्या संबोधनातच मला मोठा गोंधळ दिसतो आणि हे असं का, याचं स्पष्टीकरण संबंधीतांनी स्थानिक जनतेला देणं गरजेचं आहे. […]
आपली प्रमाण भाषा मराठी आहे. तशी ती महाराष्ट्रातल्या सर्वच बोलींची प्रमाण भाषा मराठी आहे. व्यवहारासाठी एक भाषा असणं सोयीचं असतं म्हणून प्रमाण भाषेचं महत्व. अन्यथा त्या त्या भागातील. सर्वसामान्य लोकांचा विचार विनिमय स्थानिक लोकभाषेतच होत असतो. तद्वत, सिंधुदुर्गात मराठी जरी व्यवहाराची भाषा असली, तरी लोकव्यवहाराची भाषा मालवणी आहे. आपण मराठी ही आपली मातृभाषा आहे असं म्हणत असलो, तरी आपली खरी मातृभाषा ‘मालवणी’ आहे. मराठी आणि मालवणीतला फरक नेमका सांगायचा तर सहावारी साडी आणि नऊवारी साडडी येवढाच सांगता येईल. नऊवारी नेसणाऱ्या आपल्या मालवणी आईने, मराठीची सहावारी साडी नेसावी, इतकाच फरक या दोन भाषांमधे आहे.. […]