नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

भेट. अर्थात, गिफ्ट..!

भेट देणाऱ्याच्या दृष्टीने अगदी लहान असलेली ’भेट’, भेट दिलेल्याला काय मिळवून देईल, ते सांगता येत नाही..त्याचे हे दोन किस्से. एक मित्राने सांगीतलेला, तर दुसरा मी स्वत: अनुभवलेला.. […]

कथुआ, उन्नाव, सुरत आणि राजकारण

आपल्या राजकारणाची पातळी किती घसरलीय ह्याची ही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी उदाहरण आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू, मुसलमान आणि एकूणच सर्व समाजातील लोकांनी आणि विविध नेते/पक्षाच्या आंधळ्या फाॅलोअर्सनी या प्रकरणात भावनांच्या आहारी न जाता, हे नेमकं काय राजकारण शिजत आहे हे समजून घेऊन वागण्याची आज गरज आहे. […]

श्री. मुसा शेख : मला मिळालेलं सरस्वतीचं देणं..

देवाने याउप्पर मला इतर काही नाही दिलं तरी माझी काही तक्रार नाही, कारण मला मकरंदजी, मुसाजी आणि अशाच काही निस्वार्थ मित्रांचं जे देणं सरस्वतीच्या आशीर्वादाने मिळालंय, ते कुठल्याही लक्ष्मीपुत्राच्या नशिबात नाही.. […]

बलात्कार का होतात?

देशात नुकत्याच घडणाऱ्या विविध बलात्कारांच्या बातम्या आणि त्यतून सरकारवर केले दोषारोप हा राजकारणाचा भाग आहे. बलात्काराची कारण सामाजिक आणि मानसिक आहेत. स्त्री-पुरुषांचा सेक्स बद्दल असलेला नैसर्गिक कल या मागे आहे. कोणतंही सरकार आणि कितीही कठोर शिक्षा बलात्कारांना आळा घालू शकत नाहीत. […]

क्विन व्हिक्टोरीयाचा ब्रिटीशकालीन मखर सापडला

महालक्ष्मीच्या भुलाभाई देसाई रोजवर ब्रिच कॅन्डी हाॅस्पिटल आहे. या हाॅस्पिटलच्या समोरच्या उंचं इमारतीत ‘रेमंड्स’चं मोठं शोरुम आहे. ही इमारत म्हणजे रेमंड्सच्या सिंघानीयांचं नवं घर. या इमारतीच्या दर्शनी भागावरच हे मखर आणि त्यात एक पुतळा बसवलेला पाहायला मिळेल.अगदी हमरस्त्यावर आणि सहज दिसेल अशा ठिकाणी हे मखर आहे. इच्छुकांनी जाऊन जरूर बघून यावं. […]

तुमचा पक्ष कोणता?

निवडणूकांना आता फक्त वर्ष राहीलंय. मतदारांना फितवण्याचे आणि भडकवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तरी डोकं शांत ठेवा. तुमच्या जीवावर पोळी भाजायचा सर्वांचा कावा लक्षात घेऊन, या निवडणूकीत तुमचा पक्ष कोणता असं कुणी विचारलं, तर ‘देश आणि देशहित’ हाच आमचा पक्ष असं ठणकावून सांगायला कचरू नका.. […]

लग्न; समस्या की समोसा?

‘मनगट आणि बुद्धीच्या जोरावर जगातल्या सर्व समस्यांवर मार्ग काढता येतो’, या अर्थाचं एक विवेकानंदांचं वाक्य आहे. मी काही ते वाचलेलं नाही. विवेकानंदांचं नसलं, तरी जागतल्या बऱ्याच विचारवंत, तत्ववेत्त्यांनी अशाच अर्थाचं काही न काही, कधी ना कधी सांगीतलेलं आहे. […]

जो पेजेला देतो, तो शेजेला घेतोच.. अर्थात आपली लोकशाही

जो शेजेला घेतो, तो शेजवर जे करेल ते निमुटपणे सहन करायचं असतं हे ओघानंच येतं. आपण आपल्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या शेजेवर चढवले गेलो आहोत आणि वेळीच जागे झालो नाही, तर अनैसर्गिक बलात्कार अटळ आहे.. […]

मुद्राराक्षस : आधुनिक काळातला..

हल्ली हा जुना मुद्रा राक्षस मोबाईलवर भेटू लागलाय. पुन्हा पुन्हा आणि वारंवार. मुद्रा राक्षस हे नांव सर्व काम छपाईच्या मशिनवर व्हायचं त्या काळातलं आहे. सध्या टायपिंगचा काळ असल्याने याला ‘टायपो डेमाॅन’ म्हणावं का, की त्याला आणखी कुठलं मराठी नांव द्यावं हे कळत नाही. […]

मी श्रीमंत झालो

कोणत्याही कलावंताला मी देवाचा पृथ्वीवरचा अंश (अवतार नव्हे, अवतार भ्रष्ट असू शकतो) मानतो आणि म्हणून प्रभाकरपंतानी काढलेलं माझं व्यंगचित्र मला साक्षात देवाचा आशीर्वादच वाटतो.. देवाचा आशिर्वाद असाच अचानक मिळत असतो, तो ओळखता आला पाहिजे मात्र..!! […]

1 6 7 8 9 10 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..