श्री. (ना)राज ठाकरे आणि पाडव्याचं भाषण
परवाच्या पाडव्याच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी मनसेसाठी नसून श्री. राज ठाकरेंसाठी होती याविषयी कुणाचं दुमत असू नये. या सभेत पक्षाचा घसरणारा क्रमांक वर आणण्यासाठी राज ठाकरे यांनी तेथे जमलेल्या कार्यकर्त्याना काहीतरी गृहपाठ देणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. केवळ मराठी माणूस आणि मराठी भाषा हा, सध्याच्या काळात, राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. श्री. राज ठाकरेंना आता आपला पाया अधिक व्यापक करण्याची गरज आहे. […]