नवीन लेखन...
Avatar
About संदीप सामंत
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

तो ताठ मानेने गेला म्हणून

क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर क्रिकेटबाह्य कारणांसाठी गाजलेल्या खेळाडूंची संख्या काही कमी नाही.
एक दिवसीय सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावा हव्या असताना,कर्णधार व आपला वडीलभाऊ ग्रेग चॅपलच्या आदेशावरुन (मी माझ्या दिड वर्षाच्या नातवाला टाकतो तसा) ट्रॅव्हर चॅपलने फलंदाजाला सरपटी चेंडू टाकला होता. […]

तो असायला हवा होता म्हणून

स्थळ : १० वी ‘ब’ वर्गाचा पहिलाच दिवस.बालमोहन विद्यामंदिर,दादर, मुंबई. काळ : (पालकांनी आडून आडून सुचविल्याप्रमाणे) गांभीर्याने घेण्याजोगा. वेळ : १३ जून १९७७, सकाळी १०.४२. प्रवेश पहिला : (वर्गात गलबला. एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे मराठेसर वर्गात प्रवेश करतात आणि वर्गातील कुजबुज आपोआपच कमी कमी होत वर्गात संपूर्ण शांतता पसरते.) मराठेसर पाच मिनिटे ‘राष्ट्राच्या खऱ्या संपत्ती’समोर स्वागत आणि […]

दौर बदलला आहे म्हणून

माना के इस जहाँ को न गुलज़ार कर सके कुछ ख़ार कम ही कर गए,गुज़रे जिधर से हम (मान्य आहे या जगाचं नंदनवन नाही करु शकलो पण जिथे कुठे गेलो,तेथील किमान काही काटे तर कमी केले.) शंभर वर्षांची डेरेदार परंपरा असणाऱ्या समग्र चित्रपटसृष्टीच्या अंतरीची भावनाच साहिरच्या या ओळींतून व्यक्त होते अशी माझी सश्रद्ध धारणा आहे. सुप्रसिद्ध […]

नाचावेसे वाटले म्हणून

अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत. […]

योगायोग होता म्हणून

ग़ालिब म्हणतो, ख़्याल उनका सुख़न मेरा, ज़बाँ उनकी दहन मेरा बहार उनकी, चमन मेरा गुल उनके, गुलिस्ताँ मेरा ! (विचार त्याचे पण भाषा माझी, त्याचा स्वर,पण माझे मुख; त्याचा वसंतऋतु, बगिचा माझा; त्याची फुलं नि वाटिका माझी.) “कोसला”कार भालचंद्र नेमाडेंच्या शब्दांत सांगायचे तर उदाहरणार्थ मी आज मिलिंद शंकर नेरुरकरवर लिहिणार आहे. तुम्हाला पहलेछूटच सांगून टाकतो की […]

ऐकावेसे वाटले म्हणून

मध्यंतरी मी सहज वेळ जात नव्हता म्हणून टीव्हीवर ‘जेष्ठांची क्रिकेट स्पर्धा’ बघत होतो. तसाही तुमचा वेळ जात नसेल तर साळगावकरांच्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेची मागची पाने वाचणे किंवा कुठल्यातरी चॅनलवर हमखास चालू असलेला नाना पाटेकरचा “वेलकम” सिनेमा पहाणे (भगवानने दिया हुआ सबकुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है) हे अजून दोन उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहेत. […]

विसरलो नाही म्हणून

माझा एक मामेमामा (आईच्या मामेभावाला तेच म्हणतात ना ?) मला मध्यंतरी सांगत होता की ‘उदय मधुकर प्रधान’ हे त्याचेच पूर्ण नाव धारण करणारे अजून दोन सद्गृहस्थ त्याच्या ओळखीचे आहेत. आणि मला वाटतं नुसतं ‘उदय प्रधान’ हे नाव मिरवणारे अजून किती पापभिरु कायस्थ या पृथ्वीतलावर असतील ते केवळ ताम्हणी घाटातील देवी विंजाईच जाणे. […]

जिंकावेसे वाटले म्हणून

शायर लतीफ़ म्हणतो, हम सादामिज़ाजों के लिए ये भी बहोत है क्या होता है जीने का हुनर सोचना होगा । “व्यक्ती आणि वल्ली” मधे दोन वस्तादांच्या ( टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामा ), ज्याला हिंदीमध्ये ‘जीने का बहाना’ म्हणतात,त्याला अनुलक्षून लिहिताना भावूक भाषेत “पुल” म्हणतात… “तिथे एकाच क्षणाने आपला अजिंक्यपट कोरुन त्या काळजाचा जणू एक दगडी विजयस्तंभ करुन […]

खेळावेसे वाटले म्हणून

पोटाला तडस लागेस्तो मटण खाऊन अंगावर आलेली एक कुंद पावसाळी रविवार दुपार. पेंगुळलेले डोळे आणि ‘हिंदी राष्ट्रभाषा समिती’ तर्फे घेण्यात येण्याऱ्या हिंदी परीक्षांच्या ( बालबोधिनी,पहिली, दुसरी, तिसरी, प्रबोध इत्यादी ) खास वर्गाचा बालमोहनच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेला तास. […]

भेटवावेसे वाटले म्हणून (उत्तरार्ध)

शायर हसन नईम म्हणतो , एक शायर था कि जागा रात भर सारे अहमक़ सो गये आराम से। मी गेल्यावर्षी वर्ल्डकपचा “भारत-पाकिस्तान” सामना पहायला मँचेस्टरला गेलो असतानाची गोष्ट. सामन्याच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता ( अर्थात इंग्लंडच्या ) माझा मोबाईल खणाणला. “सामंतसाहेब , गुडमॉर्निंग”… …….वर्गावर आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे अशा प्रसन्न आवाजात प्रोफेसर अभिषेक निकम बोलत […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..