एकटेपणा आरोग्यास हानिकारक
‘व्यक्ती एकटा असला म्हणजे हरवतो’, असे प्रसिध्द लेखक वपु काळे यांनी त्यांच्या ‘पार्टनर’ पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या निरिक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते.
[…]