नवीन लेखन...
Avatar
About संजय क्षीरसागर
Chartered Accountant in Practise. Spiritual Writer.

आत्मपूजा उपनिषद : ६ – ७ : आत्मप्रकाश हेच स्नान आणि प्रेम हेच गंध !

सातवा श्लोक समजायला अद्वैत सिद्धान्ताची कल्पना असणं अगत्याचं आहे. अद्वैत सिद्धांत ही खरं तर वस्तुस्थिती आहे, सिद्धांत नाही; कारण त्यात सिद्ध करण्यासारखं काही नाही, फक्त जाणलं की झालं ! […]

आत्मपूजा उपनिषद : ४ – ५ : उन्मनी भाव हेच जल आणि मनरहितता हाच अर्घ्य!

प्रथम मन म्हणजे काय ते पाहू. मेंदूत सतत चालू असलेला; डोळ्यासमोरच्या निराकार पडद्यावर दिसणारा आणि कानात अविरत ऐकू येणारा दृकश्राव्य चलतपट म्हणजे मन. हा चलतपट डोळ्यासमोर असलेल्या सर्व गोष्टींना आच्छादित करून असतो आणि कानांना आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू देत नाही. हा चलतपट अहोरात्र चालू असतो आणि सिनेगृहातल्या दाराचे पडदे बंद झाल्यावर जसा चित्रपट स्पष्ट दिसायला लागतो तसा रात्री आपल्याला दृग्गोचर होतो; त्याला आपण स्वप्न म्हणतो. […]

आत्मपूजा उपनिषद : ३ : निःसंशय जाणणं हेच आसन !

आत्मपूजा उपनिषदाचं हे सूत्र सांगतं की नि:संशय जाणणं  हेच आसन !  फक्त तीन शब्दात पातंजलीच्या संपूर्ण अष्टांग योगाला, हे एकच सूत्र पार करून जातं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी; असा उभा जन्म जाईल इतका आणि क्लेशदायी प्रवास करण्यापेक्षा; फक्त ठामपणे स्वतःला जाणलं आणि त्यावर स्थिर राहिलं की विषय संपला ! […]

आत्मपूजा उपनिषद : २ : कर्मशून्य चित्त हेच आवाहन !

सर्व कर्म निराकारणं ही चित्तदशा प्राप्त होण्यासाठी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनानं कृत्य करण्याची सवय या क्षणापासनं सोडायला हवी. मनानं कोणतंही कृत्य असंभव आहे; खरं तर मनानं काम करणंच व्यर्थ आहे. जे काही काम होतं ते शरीरानं होतं आणि मनाशी त्याचा मेळ असतो;  केवळ मनानं काम हा निव्वळ कालापव्यय आहे. […]

आत्मपूजा उपनिषद : १ : स्वस्मरण हेच ध्यान !

आत्मपूजा उपनिषद केवळ १५ श्लोकांचं आहे आणि त्याच्या  प्रत्येक श्लोकात स्वतःचा उलगडा घडवून आणण्याची किमया आहे; म्हणून ही लेखमाला. : सर्व प्रस्थापित अध्यात्मात मी हा एकमेव अडथळा मानला गेला आहे. या मी लाच सर्वेजन अहंकार  समजतात आणि तो हटवण्यात साधकांचं आयुष्य वेचलं जातं; तरी तो हटत नाहीच. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..