नवीन लेखन...

चिमुकले जग

किती सोसायचे किती भोगायचे दोन चिमुकल्या हातांसाठी जगायचे बोबड्या बोलातल्या जिव्हाळ्यात झुलायचे, भाबड्या डोळ्यात त्या हास्य फुलवायचे अन् चिमण्या ओठांमधले गीत होऊन गायचे भरारणार्या पंखामधले सामर्थ्य होऊन रहायचे अंधारात मार्ग होऊन ज्योतीपरी तेवायचे जागेपणी उद्याचे स्वप्नगंध हुंगायचे अन् पुन्हा एकदा एकटे एकटेच व्हायचे ना कुणासाठी झुरायचे ना कुणासाठी फुलायचे फक्त ….. चिमण्या पिलासाठीच उरायचे

माणुसकी

कुणी नटसम्राट म्हणून गेले मला घर हवंय घर, इथे माणसाच्या आयुष्याला लागलीय घरघर. काँक्रिटचे या जंगलात हरवलीय एक गोष्ट, माणसा माणसातला माणूस झालाय नष्ट. चार घासांसाठी प्राण जाती कुणाचे, कुणी करी दान उकिरडयाला अन्नाचे. मुक्या प्राण्यांना कुणी लावी लळा, आपल्याच रक्ताचा कुणी दाबे गळा. कुणी करी मुस्कटदाबी शक्तीच्या जोरावर, कुणी भांडी खुर्चीसाठी सत्तेच्या बळावर. दाम करी […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..