कांदे पोहे एक उपयुक्त खाद्य
भारतात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले जाते. हा नाश्ता पोटभरीचा मानला जातो. जे लोक डाएटिंग करत आहेत त्यांच्यासाठी पोहे खाणे फायदेशीर असते. हे खाल्ल्याने पोटाची ढेरी वाढत नाही. पोह्यामध्ये आवश्यक असलेली व्हिटामिन्स, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात. पोह्यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या टाकून ते आणखी पौष्टिक बनवू शकता. नाश्त्यामध्ये पोह्याचे सेवन केल्याने शरीर स्वास्थ चांगले राहते. शरीलाला एनर्जी मिळते. […]