नवीन लेखन...
Sanket
About Sanket
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

लसूण खाण्याचे फायदे

सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटणी बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते. […]

फळांचे शरीराला होणारे फायदे

फळे हि मानवी जीवनाला लाभलेले ‘वरदान’ आहे. ‘फलाहार’ हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वांनी बाळगावी. […]

ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची कारणे

बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे? […]

या मार्गाने थकवा दूर करा

सततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे उपाय हे आपल्याच हातात आहेत हे आपण काय लक्षात ठेवले पाहिजे. […]

ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ असू शकतात कारणं!

आजकाल आपण आपल्या आजूबाजूला हेच पाहत आहोत की रोज सकाळी तयारी करून घाईगडबडीमध्ये आज लाखो लोकं ऑफिसला जात आहेत. पण ऑफिसमध्ये जाईपर्यंत सर्व ठीक असते पण ऑफिसमध्ये  गेल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचे कितीही मोठे टार्गेट असले तरीही झोप काही केल्या आवरता येत नाही. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून एक लक्षात ठेवा की असं कधीतरी झालं तर त्यामागे छोटेसे सामान्य कारण असू शकते. पण जर असं वारंवार होत असेल तर मात्र त्या गोष्टीकडे आपण तात्काळ लक्ष दिले पाहिजे आणि त्याची कारणं जाणून घेतली पाहिजेत, तर आज आपण जाणून घेऊयात यामागच्या काही कारणांबाबत….. […]

दोरीवरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार

लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे. […]

फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राखायचंय ?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणजेच डब्ल्यू.एच.ओ. नुसार, दरवर्षी जवळपास 3 लाख लोकं श्वसनासंबंधी आजारांनी पीडित होतात , ह्याचे मूळ कारण दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रम असून, असा दिनक्रम तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवत राहतो. त्यामुळे तुम्हाला कालांतराने श्वास घेण्यास त्रास होऊन श्वसनासंदर्भातील विकारही होऊ शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार , योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे तुम्हाला फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते. […]

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय

आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची आवश्यकता असते. ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजारांची लागण पटकन होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात थोडेसे बदल करणं आवश्यक असतं.  […]

या कारणांमुळे महिलांमध्ये वाढतो मधुमेहाचा धोका!

तुम्हाला कदाचित हे ऐकून नवल वाटेल की आजच्या धकाधकीच्या काळात पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात आहे. हल्लीची जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे हल्लीच्या जवळ जवळ सर्वच वयोगटातल्या महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं जास्त आढळून येत आहेत. […]

सतत ढेकर येण्याची कारणे

जेवणानंतर ढेकर देणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. किंबहुना जेवणानंतर ढेकर दिल्यानंतर जेवणाऱ्याचे मन आणि भूक दोन्ही तृप्त झाले अशी मान्यता आपल्याकडे आहे. तर काही लोक ढेकर येण्याला अपचनाचे लक्षण समजतात. अश्या वेळी ढेकर येण्यामागे नक्की कोणते शास्त्रीय कारण आहे हे जाणून घेणे अगत्याचे आहे.  […]

1 2 3 4 5 6 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..